राज्यात उद्या सोमवारपासून हवेचा दाब वाढण्याची शक्यता असून तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेचे प्रमाण कमी होईल. आठवड्यात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र कायम राहणार असून राज्यातील हवामान गुरुवार (ता. 21) पर्यंत ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या उत्तरेकडील भागात पावसाची शक्यता कायम राहणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.
या आठवड्यात उस्मानाबाद, नांदेड, जालना, सोलापूर भागांत ढगाळ वातावरण राहील. या आठवड्यात वाऱ्याच्या दिशेत बदल होत आहे. बऱ्याच भागात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. महाराष्ट्रातील बऱ्याच भागात आकाश निरभ्र राहील. पश्चिम विदर्भात वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. तसेच धुळे, जळगाव, बीड, हिंगोली, जालना, वर्धा, नागपूर व नगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग 15 कि. मी. पेक्षा अधिक राहील. नैर्ऋत्य मॉन्सूनसाठी हे चिन्ह चांगले निर्देशक आहे. सकाळची दुपारची सापेक्ष आर्द्रता अत्यंत कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील.
कोकण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमानात घट होऊन ते 34 अंश सेल्सिअस, तर पालघर जिल्ह्यात 37 अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान रत्नागिरी जिल्ह्यात 38 अंश सेल्सिअस, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत 39 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत 25 अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यांत 68 ते 79 टक्के, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत 79 ते 84 टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत 24 ते 38 टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग 2 ते 7 कि.मी. आणि दिशा नैर्ऋत्य व आग्नेयेकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र : कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात 41 अंश सेल्सिअस, जळगाव जिल्ह्यात 42 अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत 43 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक व धुळे जिल्ह्यात 24 अंश सेल्सिअस, तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत 26 अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 35 ते 47 टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता फक्त 7 ते 10 टक्के इतकी कमी राहील. हवामान दुपारी अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग जळगाव व धुळे जिल्ह्यात ताशी 15 ते 16 कि. मी., तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत 11 कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. उष्ण व कोरडे हवामान राहील.
महत्त्वाची बातमी : कांद्याला मिळाला एक रुपये किलोचा दर ; कांदा उत्पादक अडचणीत
मराठवाडा : लातूर जिल्ह्यात कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात किमान तापमान 24 अंश सेल्सिअस, तर बीड जिल्ह्यात 26 अंश सेल्सिअस आणि उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत 27 अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, नांदेड व जालना जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. औरंगाबाद जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता 59 टक्के तर उर्वरित उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत 12 ते 22 टक्के इतकी कमी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता 4 ते 7 टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग बीड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत 15 ते 19 कि.मी., तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत 7 ते 11 कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्य आणि आग्नेयेकडून राहील. हवामान उष्ण व कोरडे राहील.
लक्षवेधी बातमी : महाबीजकडून सोयाबीन बियाण्यात फसवणूक ; बारामतीच्या शेतकऱ्यांना फटका
पश्चिम विदर्भ : कमाल तापमान बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत 43 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात 27 अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यात 28 अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 13 ते 19 टक्के इतकी कमी, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 6 ते 7 टक्के इतकी राहील. बाष्पीभवनाचा वेग वाढेल. वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होऊन तो 14 ते 18 कि. मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. हवामान उष्ण व कोरडे राहील.
ही वाचा मान्सूनची बातमी : हवामान विभागाने जारी केला यंदाच्या मान्सूनचा पहिला अंदाज
मध्य विदर्भ : नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत 44 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात 28 अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत 27 अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 10 ते 11 टक्के इतकी कमी, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता केवळ 5 टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग 12 ते 17 कि. मी. आणि दिशा नैर्ऋत्येकडून राहील.
हे नक्की वाचा : ज्वारीपेक्षा कडब्याला मागणी
पूर्व विदर्भ : कमाल तापमान गोंदिया जिल्ह्यात 42 अंश सेल्सिअस, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत 43 अंश सेल्सिअस, तर भंडारा जिल्ह्यात 44 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया व भंडारा जिल्ह्यात 25 ते 26 अंश सेल्सिअस, तर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांत 28 ते 29 अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात 39 टक्के तर भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यांत 12 ते 22 टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता 4 ते 7 टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग 4 ते 7 कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. हवामान उष्ण व कोरडे राहील.
महत्त्वाची बातमी : 27 कीटकनाशकांवर केंद्र सरकार आणणार बंदी
दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र : कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस, तर सातारा जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअस राहील. सांगली, पुणे व नगर जिल्ह्यात कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सोलापूर जिल्ह्यात 27 अंश सेल्सिअस, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत 24 ते 25 अंश सेल्सिअस राहील. सोलापूर जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात 85 टक्के, सांगली व सातारा जिल्ह्यांत 50 ते 52 टक्के, पुणे जिल्ह्यात 42 टक्के व नगर जिल्ह्यात 28 टक्के राहील. दुपारच्या सापेक्ष आर्द्रता 5 ते 14 टक्के इतकी कमी राहील. सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग 13 ते 15 कि. मी. राहील. उर्वरित जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग 4 ते 8 कि. मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1