जेष्ठ नेते खा शरद पवार यांना शेतीक्षेत्रातील चांगलेच ज्ञान आहे; शिवाय त्यांना त्याविषयाची जान आणि आवडही आहे. विशेषत: त्यांनी केंद्रीय कृषीमंत्री असताना अनेक शेतकरी उपयोगी योजना राबवून शेतीला समृद्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यामुळेच त्यांना सहकार आणि शेती क्षेत्राचे जणकार म्हणतात. सध्या राज्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न लक्षात घेता त्यांनी ऊस शेतीचा विषय लक्षात घेवून शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला असून, उद्याच्या समृद्ध शेतीसाठी तो नक्कीच उपयोगाचा आहे.
हे वाचा : कांद्याला मिळाला एक रुपये किलोचा दर; कांदा उत्पादक अडचणीत
अंकुशनगर (ता. अंबड) येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या 60 हजार लिटर प्रतिदिन क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील होते. त्यासोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे, वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, महाराष्ट्र राज़्य सहकारी साखर कारखाना संघ लि.चे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ऊस शेती बद्दल शरद पवार म्हणाले, ऊस हे आळशी माणसाचे पीक आहे. एकदा लागण केली की, कसलेच कष्ट नाहीत की हात मशागत नाही. लागवडीपासून सिंचन, मशागत आणि तोडणी देखील यंत्राच्या सहाय्याने होते. त्यामुळे ऊस हे आळशी माणसाचे पीक आहे. दराचा विचार न करता उत्पादन घेण्यास सोपे असल्याने शेतकर्यांचा कल याकडे वाढत चालला आहे.
हे नक्की वाचा : महाबीजकडून सोयाबीन बियाण्यात फसवणूक ; बारामतीच्या शेतकऱ्यांना फटका
सध्या मराठवाड्यात उसाचे लागवड क्षेत्र प्रचंड प्रमाणात वाढल्याचे सांगून पवार म्हणाले, त्यामुळेच महाकाळा येथे वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूचे उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे. या उपकेंद्राच्या माध्यमातून उसाचे अधिक उत्पादन देणारे दर्जेदार बेणे तयार केले जाणार आहे. या बेण्याची लागवड शेतकर्यांनी करावी. एवढेच नव्हे तर या उपकेंद्रात साखर कारखान्यांना तांत्रिक दृष्ट्या कुशल तरुण उपलब्ध करून देण्यासाठी या उपकेंद्रात विशेष तांत्रिक प्रशिक्षणही दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1