लिंबू फळबागेपासून शेतकरी वर्षभरउत्पादन घेऊ शकतो. लिंबू लागवडीसाठी महत्वाच्या बाबींचा अभ्यास करणे जरुरीचे आहे. लिंबू लागवड करण्यासाठी मध्यम काळी, हलकी, मुरमाड, पाण्याचा उत्तम निचरा होणारी उदासीन सामु असणारी उपयुक्त ठरते. परंतु, जमिनीमध्ये चुनखडी नसणे आवश्यक असते. साधरनत: क्षारांचे प्रमाण 0.50 डेसी. सा / मि. पेक्षा कमी तसेच ई. सी. टक्केवारी (ई.एस.पी/ उपलबद्ध चुन्याचे प्रमाण) 10 टक्केपेक्षा कमी असलेली जमीन लागवडीसाठी योग्य आहे.
नोंद : बागेची लागवड करण्यापूर्वि संबंधित कृषि विद्यपीठामध्ये तसेच कृषि विज्ञान केंद्र अथवा उपलब्ध ठिकाणावरून मातीचे परीक्षण करून घेऊन विषय तज्ञाच्या सल्ल्याने लागवड करावी.
पावसाळ्याच्यावेळी (जून-जुलै) मध्ये लागवड करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये, साधरनत: 3 X 3 X 3 फुटावर खोदलेल्या खडड्यामध्ये साधरनत: 5 लि. कार्बनडेझिम + क्लोरोपायरीफास (द्रावण, कार्बनडेझिम 2 ग्राम + क्लोरोपायरीफास 50 ई.सी.2.5 ग्राम प्रती लीटर पाणी) वापरुन खड्याचे निर्जंतुकीकरण करावे. खड्डा भरून घेताना 10 किलो शेणखत, 2 किलो एस. एस. पी, 1 किलो निंबोली पेंड तसेच 25 ग्राम ट्रायकोडर्मा पोयटा मातीमध्ये मिसळून घ्यावे लिंबाची लागवड करण्यासाठी ०.६ X ०.६ मी. अंतरावर लागवड करावी.
लिंबू लागवडीसाठी कलमांची निवड आणि जाती : लिंबू लागवड करण्यासाठी विशिष्ट रोगांना तसेच किडीना प्रतिकारक्षम असलेल्या वाणांची निवड करावी. लिंबू कलामसाठी विशिष्ट रोग आणि किडींचा प्रतिकार क्षमतेसाठी विशिष्ट खुंटाचा वापर केलेल्या खात्रीदायक रोपवटीकेमधून कलमांचा अथवा रोपांची खरेदी करावी. लिंबू लागवडीसाठी साई सरबती, फुले सरबती ई. सुधारित जातींची निवड करू शकतो.
अन्नद्रव्य व्यवस्थापन : नवीन लागवड केलेल्या लिंबाच्या बागेसाठी पहिल्या वर्षाच्या झाडासाठी, तसेच पुढील वर्षासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना पुढील प्रमाणे नियोजन करावे. एक वर्षे वयाच्या झाडाला 375 (815) ग्राम/झाड नत्र (युरिया), 150 (938) ग्राम/झाड स्फुरद (एस.एस.पी.) व 200 (333) ग्राम/झाड पालाश (एम.ओ.पि.) ची मात्रा द्यावे. दोन वर्षे वयाच्या झाडाला 750 (1630) ग्राम/झाड नत्र (युरिया), 300 (1875) ग्राम/झाड स्फुरद (एस.एस.पी.) व 700 (666) ग्राम/झाड पालाश (एम.ओ.पि.) ची मात्रा द्यावे. तीन वर्षे वयाच्या झाडाला 1125 (2445) ग्राम/झाड नत्र (युरिया), 450 (2812) ग्राम/झाड स्फुरद (एस.एस.पी.) व 600 (1000) ग्राम/झाड पालाश (एम.ओ.पि.) ची मात्रा द्यावे. चार वर्षे वयाच्या झाडाला 1500 (3260) ग्राम/झाड नत्र (युरिया), 600 (3750) ग्राम/झाड स्फुरद (एस.एस.पी.) व 600 (1000) ग्राम/झाड पालाश (एम.ओ.पि.) ची मात्रा द्यावे. पाच वर्षे वयाच्या व त्यापुढील वयाच्या झाडाला 1500 (3260) ग्राम/झाड नत्र (युरिया), 600 (3750) ग्राम/झाड स्फुरद (एस.एस.पी.) व 800 (1333) ग्राम/झाड पालाश (एम.ओ.पि.) ची मात्रा द्यावे.
नोंद : उपरोक्त खताची मात्र देताना नत्रयुक्त खतांची मात्रा प्रती झाडासाठी समान तीन टप्यामधे विभागून द्यावी (जानेवारी, जुलैआणि नोव्हेंबर) नत्राच्या एकूण गरजेपैकि ५०% मात्रा रासायनिक खताद्वारे (युरिया किंवा अमोनियम सल्फेट) तसेच उर्वरित नत्राची मात्रा सेंद्रिय खते आणि निंबोळी पेंड च्या स्वरुपात द्यावी. साधारणत: प्रती झाडासाठी १५ की. निंबोळी पेंड आणि १५ की. सेंद्रिय खत फळधारणायोग्य झालेल्या झाडासाठी वापरावी (स्रोत:- कृषि- परिस्थितीक तांतर आधारित एकात्मिक कीड नियंत्रण तंत्र अहवाल)
ठिबक सिंचनाद्वारे अन्नद्रव्ये व्यवस्थापन : कार्यक्षम अन्नद्रव्य व्यवस्थापणासाठी शिफारशीच्या मात्राच्या (100%) प्रमाणाच्या 80% (१०४३ ग्रॅ. युरिया आणि ९६० ग्रॅ. ००:००:५०) प्रती झाडासाठी प्रती वर्षासाठी दीड महिन्याच्या अंतराने समान हप्त्यात ठिबक सिंचांनाद्वारे द्यावे तसेच १८७५ ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट प्रती झाड द्यावे. सिंगल सुपर फॉस्फेट हे १५ किलो निंम्बोळी पेंड + १५ की. सेंद्रिय खताबरोबर द्यावे (महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी, कृषि दैनंदिनी)
लिंबू बागेमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन : लिंबू पीक हे अन्नद्रव्यप्रिय पीक आहे. लिंबामध्ये विविध विकृती टाळण्यासाठी तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यची कमतरता दूर करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रवयाचे संयुक्त मिश्र खताद्वारे फवारणी करावी. वर्षामधून साधारणत: दोन वेळा झिंक सल्फेट, मॅग्नीशियम सल्फेट, म्यग्नीजसल्फेट प्रत्येकी 5 ग्रा. प्रती लीटर पाण्यातून फवारणी करावी. तसेच फेरस व काँपर सल्फेटची प्रत्येकी 3 ग्राम प्रती लीटर पाण्यातून फवारणी करावी. प्रती झाड 500 ग्राम व्ह्याम + 100 ग्राम स्फुरद विरघळणारे जिवाणू + 100 ग्राम आझोस्पेरिलम + 100 ग्राम ट्रायकोडर्मा व्हरजिनम घ्यावे.
रसायनिक नियंत्रण : कोळी कीडीचा प्रादुर्भाव पाण्याची कमतरता भासल्यास जास्त जाणवतो. पावसाने उघडीप दिल्यास तसेच ढगाळ वातावरणात देखील प्रमाण अधिक जाणवते. पाण्यात मिसळणारी गंधक 3 ग्राम किंवा डायकोफोल 18.5 % ई. सी. 2 मिलि/लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (टीप: कोळी कीडीची माहिती अगोदर नंतर रासायनिक नियंत्रण क्रमवार.)
काळी / पांढरी माशी : मेक्यानिकल कीड नियंत्रण पद्धत : प्रादुर्भाव झालेला भाग काढून नष्ट करावा. 550 एन.एम. तरंग लहरीचे प्रकाश सापळ्याचा वापर करावा. पिवळे चिकट कार्डच वापर करावा.
नैसर्गिक पध्दतीने (जैविक) कीड नियंत्रण : क्रयसोपार्ला स्पे., लेडी बर्ड भुंगेरे ई. भिन्न किडिचे प्रमाण वाढण्यासाठी या भिन्न किडीना आकर्षित करण्यासाठी बागेमध्ये मोहरी, झेंडू, गाजर, चवळी ई. चे अंतरपीक घ्यावे.
रासायनिक नियंत्रण : निंबोळी अर्काची फवारणी करावी (5%) किंवा निंबोळी तेल 10 मिलि/ लिटरपाणी. गरजेनुसार फवारणी करावी साधारणत: दोन फवारणी मधील अंतर 10 दिवसाचे असावे.
मावा : नवीन पालवीच्यावेळी प्रादुर्भाव आधिक आढळून येतो.
नियंत्रण : पिवळ्या रंगाच्या चिकट कार्डाचा वापर करणे. नैसर्गिकरित्या नियंत्रण करण्यासाठी भिन्न किडीना आकर्षित करण्यासाठी लेडीबर्ड भुंगे सिरफिड नाशी यांचे प्रमाण वाढण्याच्या हेतूने बागेमध्ये गाजर, आले, मोहरी, चवळी ई॰ पिकांची आंतरपिक म्हणून निवड करावी.
प्रती दिवसा प्रौढ लेडीबर्ड भुंगेर साधारणत: 50 मावा किडिचा खाऊन नायनाट करतो. तसेच, होवर माशीच्या जीवनक्रमातील पहिल्या आळीच्या अवस्थेत प्रती दिनी 15-19 मावा किडीचा नायनाट होतो. दुसर्या आळी अवस्थेत 45 ते 52 तिसर्या आलीच्या अवस्थेत 1 आळी प्रती दिनी 80 ते 90 मावा किडीचा प्रती दिनी नायनाट करू शकतात.
या प्रमाणे पूर्ण जीवन क्रमामध्ये होवर माशी (होवर फ्लाय) जवळपास 400 मावा किडींचा खाऊन नायनाट करू शकते. तसेच ग्रीन लेसविंग (ग्रीन लेसविंग) भिन्न किडींची आळी अवस्ता 100 मावा कीडींची नियंत्रण करू शकते, तसेच 329 काळी माशिंच्या कोश अवस्थेचा नयनाट करू शकते.
भिन्न किडींच्या नैसर्गिकरित्या वाट होण्यासाठी बागेमध्ये गाजर, झेंडू, मोहरी, धने, चवळी ई. अंतर पिकाची निवड करावी. मावा किडींच्या नियंत्रणासाठी प्रती लीटर पाण्यामधून 5 मिलि ईमिडा क्लोप्रीड 17.8% एस.एल. फवारणी करावी, किंवा क्लोरीपायरिफोस 20 ई.सी. 1-2 मिलि/ लिटर पाणी घेऊन फवारणी करू शकतो.
रोग व्यवस्थापन:
कँकर: कँकर हा रोग जिवाणूजन्न आहे. या रोगामुळे पानावर, फळावर तांबूस टिपके पडतात. टिपके खरबडीत दिसतात.
उपायोजना : रोपवटीकेतून कलम/ रोपांची निवड करतांना, रोग मुक्त कलमांची निवड करावी. झाडावरील रोग ग्रस्त भागाची छाटणी करून नायनाट करावा. छाटणी आणि वळण योग्य पद्धतीने करावी जेनेकरून बागेमध्ये हवा खेळती राहील.
रसायनिक नियंत्रन : काँपर ओक्सिक्लोरइड 3 ग्राम+ स्ट्रेप्तोमायसिन (50-100 पिपीएम) 0.5-1 ग्राम/ 10 लीटर पाण्यासाठी फवारणी करावी. स्ट्रेप्तोमायसिन हे प्रती जैवकाचे घटक स्ट्रेप्तोमायसिन सल्फेट 90%+ स्ट्रेप्तोमायसिन हायड्रोक्लोराइड 10% आहे. झाडाची छाटणी केल्यावर अथवा प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या भागची काढणी केल्यास 4 फवारणी 1 महिन्याच्या अंतराने करण्यासाठी काँपर ओक्सिक्लोरइड 30 ग्राम स्ट्रेप्तोमायसिन 1 ग्राम आणि निंबोळी तेल 50 मिलि/ 10 लिटर पाण्यातून फवारावे.
डॉ. किशोर मुठाळ, प्रा. राजेंद्र लिपणे, प्रा. शुभदा पलघडमल, कृषि महाविदयालय, सोनई, ता. नेवासा, जि. अहमदनगर ४१४१०५. संपर्क.- ७८७५२५७७७०/९७६७०८५६६३