कोळसा आणि वीज टंचाईमुळे राज्यात वीज टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. या बैठकीनंतर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेवून माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी वीज टंचाईबाबत सविस्तर माहिती दिली.
महत्त्वाची बातमी : वैज्ञानिकांनी कृषी क्रांतीच्या माध्यमातून देशाला जगद्गुरू करावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
यावेळी बोलताना ते म्हणाले, अदानी कंपनीकडून होणाऱ्या वीज पुरवठयात अचानक कपात झाल्यामुळे राज्यात 1400 ते 1500 मेगावॉट विजेचे भारनियमन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने वीज जपून वापरावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राज्यातील वीज उपलब्धतेची सद्यस्थिती पाहता भारनियमन कधीपर्यंत असेल, हे सांगता येणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
नक्की वाचा : फळे फुलांपासून मद्यार्क निर्मिती धोरणास मान्यता
यामुळे पुढील काही दिवस तरी परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता व्यक्त करून ते म्हणाले. 58 टक्के पेक्षा अधिक वीज गळती असलेल्या तसेच वीज बिलांची थकबाकी अधिक असलेल्या G1, G2 आणि G3 भागात, तसेच ज्या भागात विजेची चोरी होते अशा भागात चार ते पाच तासापर्यंतचे भारनियमन करण्यात येणार आहे. हे भारनियमन 1400 ते 1500 मेगावॉटचे असणार आहे. यामुळे आता उन्हाळ्यात याचा मोठा त्रास होण्याची शक्यता आहे.
आनंदाची बातमी : बैलगाडा शर्यतप्रकरणी दाखल गुन्हे मागे घेणार
वीज भारनियमन एकट्या महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात आहे. केंद्र सरकारचे कोळशाचे नियोजन फसले आहे. शिवाय कोळसा मंत्रालयाला रेल्वे मंत्रालयाचे सहकार्य नाही. त्यामुळे भाजपने खुशाल केंद्र सरकारविरोधात आंदोलन करावे, असे ऊर्जामंत्री राऊत यांनी म्हटले आहे.
हे वाचा : पुढील दोन दिवसात या १० जिल्ह्यात मुसळधार पाऊस !
राज्यात लोडशेडिंगमुळे अनेकजण गेल्या काही दिवसांपासून वैतागले आहेत. शिवाय सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बाचाबाची सुरु आहे. तसेच शेतकऱ्यांना देखील वीज पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने शेतकऱ्यांचे देखील आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी शेतकरी आणि सर्वसामान्य लोक करत आहेत.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1