प्रधानमंत्री किसान सन्मा निधी योजनेत नोंदणीकृत लाभार्थी असूनही ज्या लाभार्थ्यांना अद्याप किसान क्रेडिेट कार्ड मिळालेले नाही, अशा जवळपास 33 लाख 57 हजार लाभार्थ्यांना उद्या रविवार, दि. 24 एप्रिल रोजी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा घेवून किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात येणार आहे.
राज्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नोंदणीकृत 1 कोटी 14 लाख 93 हजार लाभार्थ्यांपैकी केवळ 81 लाख 36 हजार लाभार्थी किसान क्रेडिट कार्ड धारक आहेत. राज्यात जवळपास 33 लाख 57 हजार पीएम. किसान नोंदणीकृत लाभार्थी हे अद्यापही किसान क्रेडिट कार्ड धारक नाहीत. अशांना या विशेष ग्रामसभेत पीएम. किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज देण्यात येतील. या ग्राम सभेमध्ये बँक प्रतिनिधी उपस्थित राहून ग्रामस्थांना या विषयी माहिती देणार आहेत.
नक्की वाचा : यंदा आंबाप्रेमींना मोजावे लागणार जास्त पैसे !
केंद्र शासनाच्या किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड्स वाटप करण्यात येणार आहे. सदरची मोहीम ही भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षांतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून दि. 24 एप्रिल 2022 ते 1 मे 2022 या कालावधीत देशभर राबविण्यात येत आहे.
लक्षवेधी बातमी : लोडशेडिंगबाबत ऊर्जामंत्र्यांची मोठी घोषणा !
या मोहिमेत प्राधान्याने सर्व पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पिक कर्ज तसेच पशुधन, मस्त्यव्यवसायासाठी खेळते भांडवल उपलब्ध करण्यात येईल. या उपक्रमांतर्गत सामाजिक सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा, आणि अटल पेन्शन योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृती, तसेच नवीन लाभार्थी नोंदणी करण्यात येणार आहे.
महत्त्वाची बातमी : वैज्ञानिकांनी कृषी क्रांतीच्या माध्यमातून देशाला जगद्गुरू करावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
केंद्र शासनाने या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर कार्यप्रणाली उपलब्ध करून दिलेली असून किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सहकार, महसूल, ग्रामविकास, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य विभाग, नाबार्ड आणि जिल्हा अग्रणी बँक या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1