कृषी विभागामध्ये महिला शेतकऱ्यांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या, मात्र येत्या पुढील काळात ५० टक्के जागा राखीव ठेवल्या जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली.
नक्की वाचा : यंदा आंबाप्रेमींना मोजावे लागणार जास्त पैसे !
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, आमदार डॉ. राहुल पाटील, कृषी सचिव एकनाथ डवले, शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. भगवान आसेवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी बळिराम कच्छवे, महिला शेतकरी लक्ष्मी भिसे, रेणुका जाधव, यशोदा सोळंके, विजया देशमुख, द्रौपदी काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
लक्षवेधी बातमी : लोडशेडिंगबाबत ऊर्जामंत्र्यांची मोठी घोषणा !
यावेळी पुढे बोलताना कृषीमंत्री भुसे म्हणाले, आपल्या कृतीमधून महिलांचा सन्मान झाला पाहिजे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश आहे. त्याच उद्देशाने या कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन हे महिला शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. लक्ष्मी योजनेंतर्गत घारातील महिलेचे नाव 7/12 उतार्यावर मोफत लावले जाणार आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या शेतीमाल आणि महिला बचत गटाच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी शासकीय जागा देखील उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महत्त्वाची बातमी : वैज्ञानिकांनी कृषी क्रांतीच्या माध्यमातून देशाला जगद्गुरू करावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
आता कृषी क्षेत्रात मुलींचे प्रमाण 55 टक्के वाढले असल्याचे सांगून कृषीमंत्री भुसे म्हणाले, या कृषी महाविद्यालयामुळे ग्रामीण भागात कृषी शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. येथील हॉस्टेल तसेच कर्मचारी निवासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पूर्वी कृषी विभागात महिला शेतकर्यांसाठी 30 टक्के जागा राखीव ठेवल्या जात होत्या आता त्या 50 टक्के ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1