देशी गायींच्या देखभालीसाठी दरमहा मिळणार ९०० रुपये !

0
483

देशी गायींच्या संगोपनासाठी सरकार शेतकऱ्यांना दरमहा ९०० रुपये देणार असल्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकतीच केली. निती आयोगाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत दूरदृश्‍यप्रणालीद्वारे शिवराज सिंह यांनी सहभाग घेतला. त्या वेळी त्यांनी ही घोषणा केली.

नक्की वाचा : किसान रेल्वे तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय

मध्य प्रदेश नैसर्गिक शेती विकास मंडळाच्या नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणारी घटना मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी जाहीर केली. नैसर्गिक शेतीमध्ये देशी गायींचे मोठे महत्त्व असून, शेतकऱ्यांनी किमान एका देशी गायीचे संगोपन करावे. त्यासाठी सरकार त्या शेतकऱ्यांना गायींच्या संगोपनासाठी दहमहा ९०० रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून शेतकऱ्याला वर्षाला १० हजार ८०० रुपये देशी गायींसाठी मिळतील, असे त्यांनी सांगितले.

महत्त्वाची बातमी : विदर्भात उष्णतेची लाट ; तर राज्य पुन्हा तापणार !

राज्याच्या सर्व ५२ जिल्ह्यांतील प्रत्येकी १०० गावांत नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार खास कार्यक्रमही राबवणार असल्याचे मुख्यमंत्री चौहान यांनी सांगितले. या खरीप हंगामापासूनच राज्यातील ५२०० गावांत नैसर्गिक शेतीसाठीचे कार्यक्रम सुरू होणार असल्याचे ते म्हणाले. सरकार अशा शेतकऱ्यांची चाचपणी करत असून आतापर्यंत १.६५ लाख शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीसाठी उत्सुकता दाखवली आहे. नैसर्गिक शेतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार कार्यशाळा आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाची घोषणा : शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपण उभारण्यासाठी अनुदान मिळणार

मानधन तत्त्वावर सरकारकडून प्रत्येक ब्लॉकमध्ये पाच पूर्णवेळ कर्मचारी नेमण्यात येणार असून, ते नैसर्गिक शेतीच्या प्रसाराचे काम करणार आहेत. नर्मदा नदीच्या दोन्ही बाजूंच्या काठावरील शेतांमध्ये नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हे वाचा : शाश्वत उत्पन्नासाठी बांबू लागवड किफायतशीर : जयंत पाटील

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here