आता अमेरिकन लष्करी अळीवर नियंत्रण शक्य ?

0
375

मका हे कमी कालावधीत आणि जास्त उत्पादन देणारे पीक असून, बाजारात देखील याला चांगली मागणी असते. मात्र याच्या अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांना जास्त काळजी घ्यावी लागते. या पिकावर विविध प्रकारच्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रदुर्भाव होते. त्यापैकी अमेरिकन लष्करी अळी (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) ही अतिशय विध्वंसक आहे. यामुळे राज्यातील मका उत्पादक शेतकरी अतिशय वैतागले आहेत. मात्र आता नव्या तंत्रज्ञाचा दृष्टीकोन समोर ठेवून ऑक्सिटेक या आंतरराष्ट्रीय संशोधन समूहाने या अळीचे जीएम नर पतंग विकसित केले असून, यामुळे पुढची प्रजात जन्माला येण्यापासून रोखता येणार आहे.

हे नक्की वाचा : बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ब्रेक द लाईफस्टाईल नवी संकल्पना

विविध उपाय करूनही अमेरिकन लष्करी अळीला नियंत्रणात आणणे जगभरातील मका उत्पादकांना अशक्य झाले आहे. अमेरिकन लष्करी अळी मका पिकावर हल्ला करून पिकाचा संपूर्ण नायनाट करते. मात्र, या नवीन तंत्रज्ञानाच्या कार्यपद्धतीचा नवीन मादी जन्माला येणाऱ्या पिलांना प्रौढावस्थेत प्रवेश करण्यापासून रोखते. ज्यामुळे ही प्रजात पुढे जन्माला येत नाही.

आनंदाची बातमी : देशी गायींच्या देखभालीसाठी दरमहा मिळणार ९०० रुपये !

अमेरिकन लष्करी अळी या किडीने जगभरातील शेतकऱ्यांपुढे (प्रामुख्याने मका) गंभीर संकट निर्माण केले आहे. मका, ऊस आदी पिकांच्या आतील भागात राहून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याची तिची पद्धती पाहता केवळ रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून तिला आटोक्यात ठेवणे कठीण जात आहे. पीक उत्पादन ५० टक्क्यांहून अधिक घटविण्याची तिची क्षमता आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या अंदाजानुसार सन २०१८ मध्ये एकट्या आफ्रिकेत १७. ७ दशलक्ष टन मक्याचे नुकसान या किडीमुळे झाले. त्याचे आर्थिक मूल्य सुमारे ४.६ अब्ज अमेरिकी डॉलर आहे.

नक्की वाचा : किसान रेल्वे तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय

या किडीवर प्रभावी नियंत्रण आणण्याचे जगभरातील शास्त्रज्ञांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने इंग्लंड येथील ‘ऑक्सीटेक’ या आंतरराष्ट्रीय समूहाने नवा दृष्टिकोन (ॲप्रोच) असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यात जनुकीय सुधारित (जीएम) अमेरिकन लष्करी अळीचे नर पतंग विकसित केले आहेत. त्यांच्यात ‘सेल्फ लिमिटिंग जीन’चा (स्वमर्यादा जनुक) समावेश केला आहे. विशिष्ट उपकरण वा साधनाच्या माध्यमातून या जीएम पतंगांचे शेतात प्रसारण केले जाते. ते शेतातील लष्करी अळीच्या मादी पतंगांना शोधतात. दोघांचे मिलन होते. त्यातून तयार होणाऱ्या पिढीत म्हणजेच पिलांमध्ये हा ‘सेल्फ लिमिटिंग जीन’ आनुवंशिकरीत्या उतरतो. या तंत्रज्ञानाची रचना अशी केली आहे, की हे जनुक केवळ मादी किडीतच सक्रिय असते. त्यामुळे अंड्यांमधून जन्माला आलेल्या मादी पिलांची वाढ रोखली जाऊन बाल्यावस्थेतच (किंवा सुरुवातीच्या दोनच दिवसांत) त्यांचा मृत्यू ओढवतो. म्हणजेच प्रौढावस्था ते गाठू शकत नाहीत. या जनुकाचा प्रभाव नर कीटकांवर होत नसल्याने ते मात्र आपली वाढ पूर्ण करतात.

महत्त्वाची बातमी : विदर्भात उष्णतेची लाट ; तर राज्य पुन्हा तापणार !

‘सेल्फ लिमिटिंग जीन’ हाच तंत्रज्ञानाचा मुख्य गाभा आहे. या जनुकामुळे किडीच्या शरीरात विशिष्ट प्रथिनाचे वाजवीपेक्षा जास्त उत्पादन होऊन पेशींच्या कार्यप्रणालीत अडथळा निर्माण केला जातो. त्यामुळे कीटकाच्या वाढीसाठी अत्यावश्‍यक अन्य प्रथिने तयार करणाच्या पेशींच्या उत्पादनक्षमतेत हस्तक्षेप केला जातो. त्यामुळे किडीची वाढ रोखली जाऊन ती प्रौढ होण्याआधीच मृत्यू पावते.

या अळीचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वप्रथम या तंत्रज्ञानाला ब्राझील या देशाने परवानगी दिली. ब्राझील हा सर्वात मोठा मका उत्पादक देश आहे. ब्राझील देशामध्ये या तंत्रज्ञानाच्या विविध चाचण्या करण्यात आल्या आहेत. जेथे देशातील हजारो एकर बीटी मका शेतांमध्ये २०२१-२२ च्या हंगामात पथदर्शी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

महत्त्वाची घोषणा : शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपण उभारण्यासाठी अनुदान मिळणार

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here