महागाईने देशभरातील जनतेच्या खिशावर वाईट परिणाम केला असतानाच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. नुकतेच सरकारने खतांच्या अनुदानाच्या रकमेत देखील वाढ केली आहे. या अनुषंगाने केंद्र सरकारने खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना खतांच्या किमतीत दिलासा दिला आहे.
हे नक्की वाचा : रिझर्व्ह बँक म्हणते, लवकरच महागाईचा भडका उडणार
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्यानंतरही सरकारी मालकीची कंपनी इफको (IFFCO) यावर्षी 2022 मध्ये खतांच्या किमती वाढवणार नाही. गतवर्षीप्रमाणे यंदाही खतांचे दर जैसे थेच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. इफकोच्या म्हणण्यानुसार, यावर्षीही देशभरातील सर्व खतांच्या किमती स्थिर राहतील. याशिवाय खतांच्या किमती स्थिर राहिल्याने भारत सरकारनेही कंपनीला अधिक चांगली सबसिडी देण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. अहवालानुसार, केंद्र सरकार यावर्षी 2022 च्या खरीप हंगामात 60,939 कोटी रुपयांपर्यंत अनुदान देणार आहे. सध्या या अनुदानाची अंमलबजावणी झालेली नाही. खरीप हंगामात त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
लक्षवेधी बातमी : राज्यपालांच्या हस्ते कृषीरत्न पुरस्कार स्वीकारण्यास राजेंद्र पवारांचा नकार !
इफको कंपनीने 2022 च्या खरीप हंगामासाठी रासायनिक खतांच्या किमतींची यादी जाहीर केली आहे. बाजारात युरिया खताची किंमत 50 रुपये प्रति बॅग (45 किलो) आहे. डीएपी कंपोस्टची किंमत रुपये 1,350 प्रति बॅग (50 किलो) एनपीके रुपये 1,470 प्रति बॅग (50 किलो) एमओपी खताची किंमत रु 1,700 प्रति बॅग (50 किलो)
हे नक्की वाचा : भारतीय शेतकरी शेतीतून कमावतो तरी किती ? NSSO चा रिपोर्ट
अनुदानाशिवाय खताची किंमत : आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत भारतीय बाजारात खताची किंमत खूपच कमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती जास्त असल्याने सरकार शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी अनुदान देते. जेणेकरून देशातील शेतकरी खते खरेदी करू शकतील. शेतकरी बांधवाने बाजारात अनुदानाशिवाय खत खरेदी केले तर युरिया खताची किंमत 2450 रुपये प्रति बॅग आहे. डीएपीची किंमत 4073 रुपये प्रति बॅग आहे. NPK खताची किंमत 3291 रुपये प्रति बॅग आहे. तर एमओपी कंपोस्ट रु. 2654 प्रति बॅगमध्ये उपलब्ध आहे. त्याची किंमत अशीच काहीशी असते.
देशात खतांची आयात : भारतात खत उत्पादन आवश्यकतेपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे कंपन्यांना शेतकऱ्यांसाठी सर्व प्रकारची खते आयात करावी लागत आहेत. देशात युरिया उत्पादन 98.28 लाख टनांपर्यंत आहे. डीएपी उत्पादन ४८.८२ लाख टनांपर्यंत आहे. NPK उत्पादन 13.90 लाख टन पर्यंत आहे. तर एमओपीचे उत्पादन ४२.२७ लाख टनांपर्यंत आहे.
महत्त्वाची घोषणा : आमिर खानने केली शेतकऱ्यांसाठी या स्पर्धेची घोषणा
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1