गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे वारकऱ्यांना जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पायी वारी सोहळा अनुभवता आला नाही. मात्र, यंदा वैष्णवांना हा सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवता येणार आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी श्री क्षेत्र देहूगाव येथून 20 जूनला प्रस्थान ठेवणार आहे. 23 जूनला पालखी पुण्यात मुक्कामी असेल. पालखी नऊ जुलैला पंढरपूरला पोचेल, अशी माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन महाराज मोरे यांनी दिली.
हे नक्की वाचा : अजितदादा म्हणाले… ऊस हे आळशी लोकांचे नव्हे, तर कष्टकऱ्यांचे पीक
संस्थानने पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पालखी सोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. नैमित्तिक कामे संस्थानच्या वतीने सुरू करण्यात आली. परंपरेनुसार यंदा पालखी सोहळा पंढरपुरला मार्गस्थ होत असताना पुणे येथील नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात दोन मुक्काम करणार आहे. तर इंदापूर येथे पालखी तळावर दोन दिवस मुक्काम होईल. इतर ठिकाणी एकच मुक्काम होणार आहे. प्रथेप्रमाणे बेलवडी येथे पहिले तर सराटी येथे दुसरे गोल रिंगण होणार आहे. माळीनगर येथे उभे रिंगण, तोंडले बोंडले येथे धावा तर बाजीराव विहिरीजवळ आणि वाखरी येथे पादुका आरती होईल, असेही हभप मोरे यांनी सांगितले.
यंदा 13 जुलैला पालखीच्या परतीच्या प्रवासाची सुरूवात होईल. पालखी सोहळ्याची सांगता 24 जुलैला देहूच्या मुख्य मंदिरात होणार आहे. पालखी मार्गावर रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने वारकऱ्यांना थोडाफार त्रास सहन करावा लागू शकतो, असे सांगण्यात आले.
हे वाचा : अलर्ट : पुढील 4 दिवस राज्यात उष्णतेची लाट
10 जूनला देहूतील मुख्य मंदिरात पालखी प्रस्थान होणार असून पहिला मुक्काम श्री क्षेत्र देहूगाव येथील इनामदार साहेब वाड्यात होणार आहे. 21 जूनला आकुर्डी विठ्ठल मंदिर, 22 व 23 जून श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर, नाना पेठ (पुणे), 24 जूनला लोणी काळभोर, 25 जून वरवंड, 27 जून उंडवडी, 28 जून बारामती (शारदा विद्यालय), 29 जूनला सणसर (पालखी तळ), 30 जूनला दुपारचे बेलवडी गोल रिंगण त्यानंतर आंथुर्णे (पालखी सोहळा), 1 जुलै निमगाव केतकी (पालखी तळ), 2 जुलै इंदापूर येथे गोल रिंगण (दोन दिवस मुक्काम), 4 जुलैला सराटी, 5 जुलै अकलूज (माने विद्यालय येथे गोल रिंगण) होणार आहे.
लक्षवेधी बातमी :
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली या तीन शेतकऱ्यांनी कृषी पुरस्काराची रक्कम
6 जुलैला माळीनगर येथे उभे रिंगण बोरगाव, 7 जुलैला तोंडले बोंडले येथे धावा आणि पिराची कुरोली येथे मुक्काम, 8 जुलै बाजीराव विहीर येथे उभे रिंगण आणि वाखरी येथे मुक्काम, 9 जुलैला पादुका आरती येथे उभे रिंगण झाल्यावर पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. रात्री पंढरपूर येथे श्री संत तुकाराम महाराज मंदिरात मुक्कामी विसावणार आहे. 10 जुलैला नगर प्रदक्षिणा करून पालखी 13 जुलै दुपारी एक वाजेपर्यंत पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे. त्यानतर 13 जुलैला दुपारी परतीच्या प्रवासाला सुरुवात असा आहे पालखी सोहळ्याचा मार्ग व नियोजन करण्यात आले आहे.
महत्त्वाची बातमी : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ ; काय होणार परिणाम ?
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1