भारतीय हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांच्या हवामानाचा अंदाज वर्तवला असून, दरवर्षी अंदमानमध्ये पाऊस 22 मेपर्यंत दाखल होत असतो. मात्र, यंदा पाऊस यंदा मान्सून 13 ते 19 मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हे वाचा : कोविड बाधित महिलांना मोफत बियाणे, खते : नीलम गोऱ्हे
पाऊस सुरु होण्याची तारीख हवामान विभागाकडून 15 रोजी जाहीर करणार असून, आता 20 ते 26 मेपर्यंत पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर तळकोकणात 27 मे ते 2 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
हे नक्की वाचा : सरपंच व सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १ वर्षाची मुदतवाढ
पुणे हवामान विभागाचे प्रमुखे कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत पावसाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, आगामी पहिल्या आठवड्यात अंदमानानवर मान्सून दाखल होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात अरबी समुद्रावर पाऊस होईल आणि त्यानंतर पुढील आठवड्यात भारतात मान्सून दाखल होईल.
महत्त्वाची घोषणा : आता गोट बँकेची संकल्पना वास्तवात येणार
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, असनी चक्रीवादळाचा मार्ग बदलला आहे, बंगालच्या उपसागरावर ‘असनी’ चक्रीवादळाचा प्रभाव आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या राज्यांमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे, हवामान खात्यानुसार या ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. सध्या वादळामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले आहे.
आनंदाची बातमी : महाबळेश्वरमधील मांघर ठरणार देशातील पहिले मधाचे गाव
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1