सध्या देशात तापमानात मोठी वाढ झाली आहे. दिवसेंदिवस तापामानाचा पारा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात 40 ते 45 अंशाच्या आसपास तापमानाचा पारा गेला आहे. एका बाजुला उष्णतेमुळे नागरिक हैराण होत असतानाच दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पिकांना या वाढत्या तापमानाचा मोठा फटका बसत आहे.
आनंदाची बातमी : यंदा मान्सून वेळेआधी
तापमानवाढीचा पिकांवर परिणाम झाल्याने उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या प्रमाणे भारतीय हवामान विभागाकडून पावसाचे वेळोवेळी अंदाज वर्तवले जातात, तसेच अंदाज उष्णतेच्या बाबतीत देखील द्यायला हवेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हे वाचा : कोविड बाधित महिलांना मोफत बियाणे, खते : नीलम गोऱ्हे
यावर्षी वाढलेल्या उष्णतेचा परिणाम सर्वच पिकांवर झाला आहे. कोणत्याही पिकाची वाणाची 42 ते 45 अंश सेल्सिअस तापमानात गुणवत्तेच्या संदर्भात ट्रायल झालेली नाही. त्यामुळे आता हवामान बदलात टिकाव धरु शकणारे वाण विकसीत होणे गरजेचे आहे. वाढत्या तापमानामुळे फळबागेत फुलांची गळ मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशा वाढत्या तापमानात पिकाला कितीही पाणी दिले तरी ते पीक तग धरत नाही. कृषी विद्यापीठांनी 42 ते 45 अंश तापमानात टिकणाऱ्या पिकांचे संशोधन करावे. तसे वाण विकसीत करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तसेच भारतीय हवामान विभाग ज्या प्रमाणे पावसाचे अंदाज देते तसेच अंदाज उष्णतेच्या बाबतीत सुद्धा द्यायला हवेत. जेणेकरुन शेतकऱ्यांना योग्य प्रकारचे नियोजन, दक्षता घेता येणार आहे.
हे नक्की वाचा : सरपंच व सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १ वर्षाची मुदतवाढ
यदा वाढत्या तापमानामुळे 80 टक्के पिकांमध्ये फुलगळतीची समस्या झाली असून, या वाढत्या तापमानामुळे उत्पादनाता मोठी घट येण्याची शक्यता आहे. भविष्यात वाढत्या तापमानापासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांना क्रॉप कव्हरचा उपयोग करावा लागणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
महत्त्वाची घोषणा : आता गोट बँकेची संकल्पना वास्तवात येणार
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1