भारतीय हवामान विभागाने यंदा समाधानकारण पाऊस होण्याचा अंदज वर्तवीला आहे. त्यामुळे राज्यात खरीप हंगामाची पूर्व तयारी सुरू आहे. शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच दुसरी आनंदाची बातमी आली आहे. पावसाच्या अचूक अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या स्कायमेट या संस्थेनेही यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज जाहीर केला आहे.
अतिमहत्वाची बातमी : मॉन्सून उद्यापर्यंत अंदमानात तर २७ मे पर्यंत केरळात
स्कायमेट ही हवामान अंदाज वर्तवणारी खासगी संस्था आहे. विशेष म्हणजे 2003 मध्ये स्थापन झालेली ही संस्था आपल्या विश्वासाहर्तासाठी अधिक लोकप्रिय आहे. नेहमीच स्कायमेटचा अंदाज अचूक ठरतो आणि यामुळे निश्चितच शेतकऱ्यांचा देखील मोठा फायदा होतो.
आनंदाची बातमी : कृषी पर्यटन चालकांचा होणार गौरव !
स्कायमेटने जाहीर केलेल्या अंदाजात म्हटले आहे की, यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असून ते वेळेवर पडणार आहे. यावर्षी सरासरीपेक्षा 98 टक्के पाऊस पडणार आहे. यामुळे या वर्षी पीक पाणी चांगले येणार असल्याचा अंदाज आता कृषी क्षेत्रातील जाणकार लोक व्यक्त करत आहेत. यावर्षी मान्सून हा वेळेत म्हणजेच एक जूनला दाखल होणार किंवा त्यापेक्षाही आधी मान्सून दाखल होणार असल्याचा स्कायमेंटने अंदाज वर्तवला आहे.
नक्की वाचा : जालन्याची वाटचाल रेशीम हबच्या दिशेने
यादरम्यान, असनी चक्रीवादळामुळे पावसाचे आगमन लवकर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चक्रीवादळामुळे मान्सूनपूर्व पावसाचे केरळमध्ये जल्लोषात आगमन होणार असल्याचे सांगितले जात आहे. स्कायमेंटच्या अंदाजानुसार यंदा केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचे आगमन 26 मे दरम्यान केरळ मध्ये अपेक्षित आहे. मान्सून आगमन यावर्षी चार ते पाच दिवस लवकर होणार असल्याचे संकेत आहेत.
महत्त्वाची बातमी : वातावरणीय बदलांवर उद्यावर नाही आजच कामची गरज : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇