बिबट्या आलाय असं ऐकलं तरी भल्याभल्याना घाम फुटतो. बिबट्याने हल्ला केल्याची कल्पनाच करणं नको पण मालेगाव (जि. नाशिक) येथून एक घटना समोर आली आहे. एका शेतकरी कुटुंबात वाट चुकलेले बिबट्याचे बछड्याला तब्बल आठवडाभर मांजराच्या पिलाप्रमाणे वाढवलं. मात्र हे मांजरीचे पिल्लू नसून ते बिबट्याचे बछडा असल्याचे कुटुंबाच्या लक्षात येताच त्यांना घाम फुटला.
त्याचे असे झाले, मोरझर शिवारातील रावसाहेब गंगाराम ठाकरे यांच्या शेतातील घराजवळ आठवडाभरापूर्वी एक मांजरीच्या पिल्लूसारखे दिसणारे पिलू घरातील लहान मुलांना दिसले. मांजरीपेक्षा वेगळा रंग असल्याने आणि दिसायला गोंडस असल्याने मुले त्याच्यासोबत खेळू-बागडू लागले. कुटुंबीयांनाही बछड्याची ओळख न पटल्याने मांजरीचे पिलू समजून बछड्याला जीवापाड जपले. घरातील लहानग्यांनी सुध्दा या पिलूला अंगाखांद्यावर खेळवले. मात्र हे मांजरीचे पिल्लू नसून ते बिबट्याचे बच्चडे असल्याचे कुटुंबाच्या लक्षात येताच त्यांना घाम फुटला.
आनंदाची बातमी : माडग्याळी मेंढीला जीआय मानांकनासाठी हालचाली
कुटुबियांनी त्या पिल्लाला पुन्हा शेतात न सोडताच सावधगिरी बाळगत घरीच ठेवले. रोज मायेची उब देत दररोज दीड लिटर दूध पाजून त्याचे संगोपन केले. बिबट्याची आईची (बिबट्याची मादी) भेट होईल या आशेने बछड्याला रोज घराबाहेर ठेवण्याचा उपक्रम सुरू झाला. मात्र ठाकरे कुटुंबीयांच्या पदरी निराशा पडली. वाट चुकलेल्या बछड्याची आई परतलीच नाही. आठवडा उलटला तरी बछड्याची आई काही येईना. हताश ठाकरे कुटुंबीयांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ही बाब कळविली.
मोलाचा सल्ला : सीताफळ प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष देण्याची गरज : कुलगुरु डॉ. भाले
वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ही बाब कळताच त्यांनी बिबट्याच्या बछड्याला ताब्यात घेतले. या बछड्याची तपासणी वनविभागाकडून करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडे मादी आणि तिचे बछडे दिसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत होत होत्या असे मालेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांनी सांगितले.
हे नक्की वाचा : कृषि क्षेत्रातील संशोधन, प्रशिक्षणाला चालना देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
लळा लागलेल्या या बछड्याला वनविभागाच्या स्वाधीन करताच कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले. वाट चुकलेल्या या बिबट्याच्या बछड्याने शेतकरी कुटुंबाच्या घरी तब्बल आठवडाभर मुक्काम ठोकला. कुटुंबीयांनाही बछड्याची ओळख न पटल्याने त्यांनीही मांजरीचे पिलू म्हणून मायेची ऊब देत या बछड्याला लळा लावला. घरातील लहानग्यांना या बछड्याला वनविभागाच्या स्वाधीन करताना अश्रु अनावर झाले. आता या बछड्याला वनविभागाच्या हद्दीत सोडणार आहेत, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
वाचनीय लेख : कृषी पर्यटन व्यवसायात या आहेत, रोजगाराच्या नव्या संधी
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1