केंद्र सरकारकडून मागच्या दोन महिन्यात डिझेलच्या दरात तब्बल 10 रुपयांची वाढ केली. यामुळे राज्यात सरासरी डिझेलचे दर 105 रुपयांच्या आसपास पोहोचले आहे. डिझेलच्या दर वाढीचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. शेतीच्या मशागतीच्या कामांचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने नवी योजना राबवली आहे. ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ या योजनेचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होणार आहे.
महत्त्वाचा निणर्य : डाळिंब बागांचे नुकसान टाळण्यासाठी विशेष प्रयत्न करा : उपमुख्यमंत्री अजित पवार
विधवा तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला शेतकऱ्यांना पेरणी ते कापणी दरम्यान मदत व्हावी, तसेच त्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा, महिला शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी ‘ट्रॅक्टर आमचा, डिजेल तुमचे’, हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रथम ही योजना देशात प्रथमच अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. निश्चितच ही योजना राज्याला व देशाला मार्गदर्शक ठरणार आहे. कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
मान्सून अपडेट : मान्सून यंदा मुंबईत 6 जूनला तर मराठवाड्यात 11 जूनला धडकणार !
सोमवारी या उपक्रमाचा शुभारंभ झाला. वरुळ-जऊळका ता. अकोट येथील सिमा काठोळे यांच्या शेतात हा शुभारंभ पार पडला. त्यावेळी मंत्री कडू यांनी माहिती दिली. शेतकरी कुटुंबात पतीच्या मृत्युनंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी ही महिलांवर येते. पण नांगरणी, वखरणी, पंजी आणि पावसाळा सुरू झाल्यावर पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून ? असे अनेक प्रश्न त्यांच्या सामोर उभे असतात. त्यात त्यांना सहाय्य व्हावे, यासाठी हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरु केला आहे. असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले.
महत्त्वाचा निणर्य : मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश : संपूर्ण गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवा !
अकोला जिल्ह्यातील सर्व निराधार, विधवा आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांचे आर्थिक स्वालंबन होण्यास मदत करणारी ही योजना असेल. तसेच हा उपक्रम यशस्वी झाला तर राज्यभर हा प्रकल्प राबविण्यासाठी आपण प्रयत्न करु असे देखील बच्चू कडू यांनी सांगितले.
धक्कादायक बातमी : मांजर समजून पिल्लू घरी आणले अन निघाले बिबट्याचा बछडा मग….
जिल्ह्यातील तब्बल 191 महिलांना ‘ट्रॅक्टर आमचा, डिझेल तुमचे’ या योजनेअंतर्गत मदत पुरवली जाणार आहे. त्या अनुषंगाने शासनाच्या ‘विविध योजनां’च्या माध्यमातून विधवा शेतकरी महिलांकरिता ‘पेरणी ते कापणी’ दरम्यान शेतकऱ्यांना कराव्या लागणाऱ्या खर्चाकरिता मदत करण्याचे आवाहन बच्चू कडू यांनी संबंधित यंत्रणेला दिले. दरम्यान या कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी मंत्री बच्चू कडू यांनी स्वतः शेतात ट्रॅक्टर चालवत नांगरणी केली.
आनंदाची बातमी : माडग्याळी मेंढीला जीआय मानांकनासाठी हालचाली
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1