हवामान विभागाकडून दिलेले पावसाचे अंदाज हे शेवटी अंदाज म्हणूनच जाहीर केलेले असतात. शेवटी निसर्गाच्या पुढे कोणी गेलेले नाही. कित्येकवेळा पाऊस येणार किंवा नाही येणार असा अंदाज वर्तवला जातो मात्र वर्तवलेल्या अंदाजाच्या विरुद्धही झालेले आपण पाहिलेले आहे. हा अनुभव प्रत्येकाचे घेतलेला आहे. त्यामुळे यंदा मान्सून वेळेच्या अधी येणार असे म्हटले जात असले तरी त्यात किती तथ्य आहे ?
देशात यंदा 27 मे रोजी मान्सून सक्रीय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. सर्वसाधारण 1 जून रोजी मान्सून देशात सक्रीय होण्याचा अंदाज असतो मात्र यंदा तब्बल पाच दिवस आधी मान्सून देशात सक्रीय होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याला अनेक हवामानाचा अंदाज वर्तवणार्या संस्थांनी दुजोराही दिला आहे.
ब्रेकिंग न्यूज : उजनीच्या पाण्यावरून वातावरण पेटणार ?
गेल्या 25 वर्षाचा इतिहास पाहिल्यावर असे लक्षात येते की, गेल्या 25 वर्षात केवळ 3 वेळाच पाऊस 1 जून रोजी देशात सक्रीय झालेला आहे. विशेषत: मागील 25 वर्षात मान्सून मे महिन्याच्या शेवटी किंवा 1 जूननंतर आपल्या देशाता सक्रीय झालेला आहे. हे मागील आकडेवारीवरून दिसून येते. गेल्या 25 वर्षात मे महिन्याच्या शेवटी आणि 1 जूनच्या नंतर मान्सून 11 वेळेस सक्रीय झाल्याचे दिसून येते. त्यामुळे यंदा मान्सून नेमका कधी सक्रीय होईल याबाबत साशंकता निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
हे वाचा : अकोल्यात ‘ट्रॅक्टर आमचे-डिझेल तुमचे’ योजना सुरू
मॉन्सूनसंदर्भात 1997-2021 या कालावधीतील मॉन्सूनची वाटचाल पाहिली तर असे दिसते की, 2013, 2016 आणि 2020 या तीन वर्षांमध्ये मॉन्सून 1 जून रोजी सक्रिय झाला होता. तर 2000, 2008 आणि 2010 या तीन वर्षात मॉन्सून आगमनाची तारीख 31 मे होती. आणि 2011 आणि 2018 या वर्षी 29 मे रोजी सक्रिय झाला होता. आजवर सर्वात लवकर म्हणजे 26 मे रोजी 2001 आणि 2006 साली भारतात मॉन्सून सक्रिय झाल्याचे दिसते.

विशेषत: 2012 आणि 2015 साली 5 जूनला सक्रिय झाला होता. मागील 25 वर्षात 1997 आणि 2002 वर्षी सर्वात उशिरा म्हणजे 9 जून रोजी मॉन्सून सक्रिय झाला होता. यावरून असे लक्षात येते की, मॉन्सून सर्वात लवकर मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सर्वात उशिरा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात भारतात सक्रिय होतो, अशी मागील 25 वर्षातील मॉन्सूनची वाटचाल दिसते.
महत्त्वाचा निणर्य : डाळिंब बागांचे नुकसान टाळण्यासाठी विशेष प्रयत्न करा : उपमुख्यमंत्री अजित पवार
महत्वाचे म्हणजे, 2002 नंतरचे 2010 हे एकमेव वर्ष आहे, ज्यामध्ये कुठलाही कमी दाबाचा पट्टा संपूर्ण मान्सून काळात निर्माण झाला नाही. सीडीएसपीच्या माहितीनुसार, आजवर सर्वाधिक वेळा कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला होता. त्यामुळे बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे पट्टे आणि चक्रीवादळ यांचेही प्रमाण अधिक दिसते.
बंगालच्या उपसागरावरील या कमी दाबाच्या पट्ट्याचा आणि चक्रीवादळाचा परिणाम भारतीय मॉन्सूनवर होतो. त्यामुळे मॉन्सूनचे आगामन कधी लवकर तर कधी उशिराने झाल्याचे दिसते. परिणामी पावसाचे प्रमाणसुद्धा दरवर्षी बदलत राहते. कधी जास्त पडतो तर कधी कमी पाऊस पडतो. मागील दहा वर्षामध्ये जून-सप्टेंबर या महिन्यांच्या दरम्यान 900 मीमी पाऊस झाल्याचे सीडीएसपीच्या आकडेवारीवरुन दिसते.
मान्सून अपडेट : मान्सून यंदा मुंबईत 6 जूनला तर मराठवाड्यात 11 जूनला धडकणार !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1