हळदीसाठी प्रसिद्ध असलेले सांगली शहर बनणार आता पिवळे शहर म्हणजेच यलो सिटी होणार आहे. हळदीच्या ब्रँडिंगसाठी सांगलीची ‘यलो सिटी’ करण्याचा निर्णय सांगली महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी घेतला आहे. यामुळे आता लवकरच सांगली महापालिकेच्या अनेक इमारती, अन्य शासकीय कार्यालये आणि प्रमुख मार्गावरील तसेच दर्शनी असणाऱ्या इमारती यलो म्हणजेच पिवळ्या रंगाने उजळणार आहेत.
मोठी बातमी : कांद्याचा दरात मोठी घसरण : कांदा फक्त 1 रुपये किलो

सांगली जिल्ह्याची ओळख ही हळदीचे सांगली अशी जगभरात आहे. त्यामुळे या हळदीचे ब्रँडिंग करण्याच्या दृष्टीने सांगलीला हळदीप्रमाणे पिवळे करण्याचा मानस आयुक्त कापडणीस यांनी व्यक्त केला आहे. अशाप्रकारे एकाच रंगाचे शहर असणारी सांगली महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे. आपल्या सांगलीच्या ब्रँडिंगसाठी यलो सिटी उपक्रमात क्रेडाईसह अनेक सामाजिक संस्था संघटना यांनी पुढाकार घेतला आहे.
हे वाचा : लिंबू 10 रुपयाला दोन, घेतंय का कोण ? का लावू शरद पवारांना फोन ! शेतकऱ्याचा व्हीडिओ व्हायरल
महापालिकेच्या यापुढे होणाऱ्या सर्व इमारतींचा रंग हा पिवळाच असणार आहे. अनेक शाळा सुद्धा पिवळ्या रंगाने रंगवल्या जाणार आहेत. यलो सिटी उपक्रमात सांगलीकर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन आपली घरे, इमारती पिवळ्या रंगाने रंगवून घ्याव्यात किंवा आपल्या घराचा दर्शनी भाग हा पिवळ्या रंगाने रंगवून घ्यावा, असे आवाहनही आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
नक्की वाचा : पुणतांब्यातून पुन्हा शेतकऱ्यांची आंदोलनाची हाक : सरकारला ७ दिवसाचे अल्टीमेटम
सांगलीमधील हळदीला सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. माहितीनुसार हळदीचा बाजार हा सांगलीतून सुरू झाला. सांगली ही देशातील हळदीची प्रमुख बाजारपेठ आहे. सांगलीत हळदीचा वायद बाजारही चालतो शिवाय राज्यातील ह्ल्डीव्हे दर सांगलीतच निश्चित होतात. हळदीच्या उच्चतम गुणवत्तेमुळे सांगलीचे नाव सातासमुद्रापार पोहोचले आहे. याच पिवळ्या धम्मक हळदीवरून सांगली शहर ‘यलो सिटी’ ब्रँडिंग करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सन 2000 मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सांगली जिल्ह्यातील तुंग हे गाव राज्यातील पहिले ‘पिंक’ व्हिलेज ठरले होते. याच धर्तीवर आता आणखी एक गाव नव्हे तर पूर्ण शहर ‘यलो सिटी’ म्हणून नावाजले जाणार आहे.
मान्सून अपडेट : मान्सून लांबणीवर !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1