राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी राज्यातील डाळिंब बागांची कीड-रोगाच्या प्रादुर्भावातून मुक्तता करण्यासाठी विशेष लक्ष घातले असून, त्यांनी या संदर्भात डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सुचना शास्त्रज्ञ व कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून सोलापुरातील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रात विविध विषयातील तज्ज्ञांचे एकदिवसीय चर्चासत्र नुकतेच पार पडले. त्यात झालेल्या चर्चेनंतर डाळिंब केंद्र काही निष्कर्षापर्यंत आले आहे.
नक्की वाचा : शेतकऱ्यांनी कृषी उत्पादनांचा दर्जा व वेगळेपणा जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
सोलापुरातील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रात विविध विषयातील तज्ज्ञांचे एकदिवसीय चर्चासत्र नुकतेच पार पडले. त्यात झालेल्या चर्चेनंतर डाळिंब केंद्र काही निष्कर्षापर्यंत आले आहे. लवकरच डाळिंबावरील वाढत्या खोडभुंगेऱ्याच्या व्यवस्थापनासाठी नव्या शिफारशी देणार असल्याचे संचालक डॅा. राजीव मराठे यांनी सांगितले.

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आणि सोसायटी फॉर अडवांसमेंट ऑफ रिसर्च ऑन पॉमग्रैनेट (सार्प) यांच्या संयुक्त विद्यमाने डाळिंबातील शॉट होल बोरर व्यवस्थापनासाठी रोडमॅप या विषयावर हे एक दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र डाळिंब केंद्रात नुकतेच पार पडले.
महत्त्वाची बातमी : गोदावरी प्रदूषित करण्याऱ्या कंपन्यांविरुद्ध होणार कारवाई
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॅा. दत्तप्रसाद वासकर, धारवाड कृषी विद्यापीठाचे किटकशास्त्रज्ञ डॅा. एस. बी. जगगीनवर, जैन उद्योग समूहाचे के. बी. पाटील, अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. तर कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक डॅा. ए. के. सिंग यांच्यासह भारतातील व इतर देशातील शॉट होल बोररवर काम करणारे काही प्रमुख भागधारक आणि तज्ज्ञ व्हिडीओ कॅान्फरन्सिंगद्वारे यात सहभागी झाले होते.
महत्त्वाची बातमी : अखेर दुधाच्या एफआरपीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नियुक्त
डॅा. मराठे म्हणाले, गेल्या दोनवर्षामध्ये हवामान बदलामुळे डाळिंबातील विविध रोग व किडींमुळे डाळिंब बागांचे नुकसान वाढले आहे. त्यामध्ये बुरशीजन्य मर, फूल व फळगळती, फळांवरील थ्रीप्स्, खरडा, कुजवा आणि शॉट किंवा पिन होल बोररचा समावेश आहे.

यावर सातत्याने आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आहोत. त्यावरच चर्चेसाठी आम्ही हे चर्चासत्र आयोजिले आहे. त्यातून काही निष्कर्ष आम्हाला मिळाले आहेत. परदेशातील तज्ज्ञांशी केलेली चर्चा आणि आपल्याकडील वातावरणात काय उपाय करता येईल, हे आम्ही लवकरच सांगू. डाळिंब संघाचे अध्यक्ष चांदणे यांनी प्रयत्न करा, पण लवकरात लवकर उपाय सांगा, असे सांगितले. सार्पचे सचिव डॅा. एन. व्ही. सिंग यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
नक्की वाचा : ऊसतोड मजूरांना महामंडळाच्या माध्यमातून न्याय देणार : मुंडे
परदेशातील तज्ज्ञांचा सहभाग : अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. बीट्रिझ नोबुआ-बेहरमन हे ऑनलाइन यामध्ये सहभागी झाले. त्यांनी आहोकाडो (avocado) या पिकावर येणाऱ्या शॉट होल बोररच्या व्यवस्थापनासाठी उपयोगात येणाऱ्या विविध उपाययोजना यामध्ये नमूद केल्या. तसेच दक्षिण आफ्रिकेतील डॉ कोबुस बोथमा यांनी काही सूचना केल्या. त्याशिवाय याच विद्यापीठातील डॉ. शेनॉन लिंच व इराणमधील डाळिंब तज्ञ डॉ. मजहर यौसुफी यांनी या किडीच्या व्यवस्थापनासाठी आपली मते मांडली.
आनंदाची बातमी : आता लवकरच सांगलीला हळद चढणार

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1