नांदेड शहरात बोगस बियाणांचे उत्पादन करून त्याची विक्री करणाऱ्या कंपनीवर कृषी विभागाने छापा टाकला आहे. नांदेड शहरातील अर्धापूर रोड वरील एका गोदामात मयुरी सिड्स आणि बुलेट ऍग्री प्रॉडक्ट्स ही कंपनी बोगस बियाणांचे उत्पादन करत होती. कृषी विभागाने छापा टाकून शेकडो क्विंटल बोगस बियाणे जप्त केले आहे.
मान्सून अपडेट : विश्रांती संपली : मान्सूनची वाटचाल पुन्हा सुरू
नांदेड शहरात एक कंपनी बोगस बियाणे तयार करत असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीवर छापा टाकला. यावेळी कंपनीत सोयाबीन, उडीद, मूग, हरभऱ्याच्या बोगस बियाणांची पॅकिंग करण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे गोदामातील सर्व बियाणे जप्त करण्यात आले आहे.

लक्षवेधी बातमी : लाल मिरचीचा ठसका !
छापा टाकल्यानंतर गोदामात 100 क्विंटल सोयाबीन, 20 क्विंटल हरभरा, 100 क्विंटल उडीद, पॅकिंग मशीन, ग्राइंडर मशीन जप्त केले आहे. यावेळी कंपनीत 20 कामगार काम करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या कारमगारांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, कृषी विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून संबंधित कंपनी सील करण्यात आली आहे.
ब्रेकिंग न्यूज : मराठवाड्यातील 60 पैकी 28 कारखान्यांचे गाळप थांबले
कृषी अधिकारी अनिल शिरपुरे आणि नांदेड पोलिसांच्या संयुक्त पथकाने हा बोगस बियाणे साठा उघडकीस आणलाय. या कंपनीत प्रथम दर्शनी सोयाबीन, उडीद, हरभरा इत्यादी बियाणे तयार केली जात होती. या कंपनीने या पूर्वी अशा किती बियाणांची विक्री केली आहे? आणि अजून कोणत्या प्रकारचे बियाणे तयार केले जात आहे का? याची कसून चौकशी केली जात आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल आगालावे यांनी दिलीय.

महत्त्वाची बातमी : राज्यातील धरणांमध्ये 37 टक्के पाणीसाठा शिल्लक
छापा टाकण्यात आलेली ही कंपनी मयुरी सिड्स या नावाने बोगस बियाणांची विक्री करत होती. तर बियाणे कंपनीचा पत्ता, कंपनीचा बोर्ड, बँग वरील ठिकाण, लॉट नंबर, बॅच नंबर अशा अनेक चुका या कंपनीत कृषी विभागास निदर्शनास आल्या आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अनिल शिरपुरे यांनी दिली आहे.
हे नक्की वाचा : पुण्यात होणार देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1