पुढच्या 72 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान मान्सून पूर्व पावसाची उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. अंदमानात 16 मेला पावसाने हजेरी लावली होती त्यानंतर साऊथ इस्टेट मान्सून वाऱ्यांची दिशा लक्षात घेता सर्वसाधारण अंदाजानुसार 5 ते 10 जून दरम्यान मान्सून कोकणात दाखल होणार आहे. असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.
महत्त्वाची बातमी : नांदेडमध्ये बोगस बियाणे कंपनीवर छापा
यंदा नेहमीपेक्षा मान्सून लवकर येणार असे हवामान खात्याकडून सांगण्यात येत होते परंतु नैऋत्य मोसमी वाऱ्याचा वेग मंदावल्याने मान्सूनची वाटचाल संथ गतीने सुरू होती. मान्सून अरबी समुद्रात तब्बल सहा दिवसांपूर्वी दाखल झाल्यानंतर श्रीलंकेजवळ थांबला होता. दरम्यान मान्सूनची वाटचाल पुढे सुरू झाली आहे. श्रीलंकेच्या निम्म्या भागासह, अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिन भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मॉन्सूनने प्रगती केली असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मान्सून अपडेट : विश्रांती संपली : मान्सूनची वाटचाल पुन्हा सुरू
मागच्या वर्षीपेक्षा मान्सूनचे आगमन अंदमानमध्ये लवकर झाले परंतु काही काळानंतर याचा वेग मंदावला. 16 मे रोजी अंदमानात आगमन झालेल्या मॉन्सूनने वाटचाल करत ता. 18 मे रोजी अंदमान- निकोबार बेटावर आला. तर 20 मे रोजी पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातूनही मॉन्सूनने वाटचाल सुरू केली. मात्र त्यानंतर मॉन्सून वाऱ्यांची पुढील प्रगती मंदावली होती. गुरुवारी 26 मान्सूनने पुन्हा वाटचाल केली असून, श्रीलंका देशाच्या निम्म्या भाग मॉन्सूनने व्यापला आहे.
लक्षवेधी बातमी : लाल मिरचीचा ठसका !
तसेच नैर्ऋत्य व अग्नेय अरबी समुद्र, मालदीवचा आणखी काही भाग, भारताच्या दक्षिणेकडील आणि श्रीलंकेच्या पश्चिमेकडील कोमोरिन भाग, तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने शनिवारपर्यंत (ता. 28) दक्षिण अरबी समुद्र, संपुर्ण मालदीव, लक्षद्वीप बेटे आणि कोमोरीन समुद्राच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच मॉन्सूनच्या केरळातील आगमनाचेही हवामान विभागाकडून निरीक्षण सुरू आहे.

ब्रेकिंग न्यूज : मराठवाड्यातील 60 पैकी 28 कारखान्यांचे गाळप थांबले
राज्यात मागचा काही दिवसांपूर्वी मान्सून पूर्व पावसाने चांगलीच हजेरी लावली. दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सून पूर्व पावसाला सुरूवात झाली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला यामध्ये पिकांसह साठवलेल्या धान्याचे नुकसान झाले आहे. विदर्भात पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता आहे. विदर्भात अचानक हवामानात बदल झाल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
महत्त्वाची बातमी : राज्यातील धरणांमध्ये 37 टक्के पाणीसाठा शिल्लक

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1