प्रयोगशील शेतीला आणि नावीन्यपूर्ण पिकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न गडचिरोली जिल्ह्यात होत आहे. गेल्या वर्षी गडचिरोली जिल्ह्यात 540 हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे. या वर्षी फळबाग लागवडीचे उद्दिष्ट 740 हेक्टरचे असून, यंदा जिल्ह्यात नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत 90 टक्के अनुदानावर ड्रॅगन फ्रूट व स्ट्रॉबेरी लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दिली.
नक्की वाचा : किराणा बाजारात अमूलची एंट्री : सेंद्रिय पीठ लॉन्च
नुकत्याच झालेल्या खरीप आढावा बैठकीत ते बोलत होते. मीना म्हणाले, की नावीन्यपूर्ण पिकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न जिल्ह्यात होत आहे. त्यानुसार स्ट्रॉबेरी व ड्रॅगन फ्रूटसाठी 90 टक्के अनुदान दिले जाईल. त्यासाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगल्या बियाण्यांसह वेळेत खतपुरवठा करावा. जिल्ह्यात दुर्गम भाग अधिक आहे. त्या ठिकाणी चांगल्या प्रतीच्या बियाण्यांचा पुरवठा व्हावा, यासाठी कृषी विभागाने यंत्रणा उभारावी. खताची गरज लक्षात घेऊन योग्य किमतीमध्ये सर्वांना आवश्यकतेनुसार खताचा पुरवठा होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हास्तरीय यंत्रणा व पुरवठादार यांच्यासोबत समन्वय गरजेचा आहे.
लक्षवेधी बातमी : उजनीचे पाणी काटेवाडीला नेण्याचा घाट
दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज माळी यांनी खरीप हंगामाविषयीची माहिती दिली. यंदा गडचिरोली जिल्ह्यात 2 लाख 19 हजार 450 हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यात एक लाख 80 हजार हेक्टर भात, तीन हजार हेक्टर मका, 12 हजार हेक्टर तूर, तर सोयाबीन 1 हजार 500 हेक्टर, तीळ 750 हेक्टर, कापूस 20 हजार 200 हेक्टरवर राहील, असे त्यांनी सांगितले.
ब्रेकिंग न्यूज : ‘या’ निर्णयामुळे होवू शकते 31 मे ला पेट्रोल डिझेलचे शॉर्टेज…?
आनंदाची बातमी : 31 मे रोजी पीएम किसानचे पैसे येणार खात्यात

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1