नॅनो युरिया खत प्रकल्पामुळे देश खताबाबतीत आत्मनिर्भर होणार आहे. त्यामुळे पैशांची ही बचत होणार आहे. नॅनो युरिया खताचा उपक्रम फक्त यापुरताच मर्यादित राहणार नाही, तर भविष्यात इतर नॅनो खतेही शेतकऱ्यांना उपलब्ध होतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
गांधीनगर येथील इफ्को, कलोल येथे बांधण्यात आलेल्या नॅनो युरिया प्रकल्पाचे उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि डॉ. मनसुख मंडाविया उपस्थित होते.
मोठी बातमी : सोयाबीन बियाण्याची भरमसाठ दरवाढ : शेतकरी हवालदील
वाढल्या मात्र देशातील शेतकऱ्यांना त्याची आर्थिक झळ बसू नये यासाठी सरकारने खतावर अनुदान देवून आडचणींचा सामना केला असल्याचे त्यांनी यावेळी आर्वजून सांगितले. युरिया, फॉस्फेट आणि पोटॅश खतांच्या आयातीच्या अवलंबित्वाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, की रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात या खतांच्या उच्च किमती आणि उपलब्धतेचा अभाव निर्माण झाला आहे.

मागील वर्षी केंद्र सरकारने खतांसाठी 1.60 लाख कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. यंदा त्यात वाढ करून अनुदान 2 लाख कोटी करण्यात आले आहे. भारत परदेशातून युरियाची आयात करतो. परदेशात ज्या एका 50 किलोच्या बॅगची किंमत 3500 रुपये आहे. मात्र देशामध्ये तिच बॅग सरकार शेतकऱ्यांना 300 रुपयांत उपलब्ध करून देत आहे. आमचे सरकार त्या प्रत्येक बॅगेमागे 3200 रुपयांचा खर्च उचलत आहे. आम्ही सर्व आडचणींचा सामना करीत असून, शेतकऱ्यांना अडचणी उद्भवू नये याची खबरदारी घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आनंदाची बातमी : स्ट्रॉबेरी आणि ड्रॅगन फ्रूटसाठी मिळणार ९० टक्के अनुदान
भारत हा खतांचा दुसरा मोठा ग्राहक असल्याचे सांगून पंतप्रधान पुढे म्हणाले, भारत हा खतांचा उत्पादनामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. सात, आठ वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात युरिया शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचत नव्हता. त्यामुळे काळ्या बाजाराला चालना मिळत होती. युरिया कारखाने नव्या तंत्रज्ञानाच्या अभावामुळे बंद पडले होते. आमचे सरकार 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर आम्ही 100 टक्के निम कोटेड युरिया तयार केला. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना पुरेसा युरिया उपलब्ध झाला. तसेच आम्ही उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा आणि तेलंगणामधील पाच बंद खत कारखाने पुन्हा सुरू केले असल्याचे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
नक्की वाचा : किराणा बाजारात अमूलची एंट्री : सेंद्रिय पीठ लॉन्च
सहकारामध्ये देशाला आत्मनिर्भर करण्याची ताकद असल्याचे सांगून ते इफ्को, कलोल येथील नॅनो युरिया (द्रव) प्रकल्पाबाबत म्हणाले, की युरियाच्या पूर्ण पोत्याची क्षमता आता अर्ध्या लिटरच्या बाटलीत आली आहे, त्यामुळे वाहतूक आणि साठवणुकीची मोठी बचत झाली आहे. या प्रकल्पामध्ये अर्ध्या लिटरच्या दीड लाख बॉटल्यांचे दररोज उत्पादन होईल. तसेच येत्या काळात देशामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प उभारण्यात येतील. अशी ग्वाही वून ते म्हणाले, अशा प्रकारच्या नॅनो युरिया (द्रव) प्रकल्पांद्वारे देशाचे दुसऱ्या देशांवरील अवलंबित्व कमी होणार आहे. तसेच पैशांची ही बचत होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
लक्षवेधी बातमी : उजनीचे पाणी काटेवाडीला नेण्याचा घाट

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1