निम्या राज्यात मान्सूनच्या पावसाने दमदार हजृरी लावली आसली तरी निम्ये राज्य आजुनही तीव्र उन्हाच्या झळांनी कासावीस झाले आहे. र्रज्यात काही भागात वादळी पावसाने चांगलाच धुमाकुळ घातला आहे तर काही भागाला मान्सून पावसाची प्रतीक्षा आहे.
आज (ता. 15) विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, कोकणात हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
सध्या पूर्व उत्तर प्रदेशापासून मनीपूरपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. कर्नाटक ते केरळपर्यंत पश्चिम किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्वमध्य अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून कच्छ, नैर्ऋत्य राजस्थान पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. विदर्भात पूर्व मोसमी पावसाच्या ढगांची दाटी झाली असून, राज्यातही तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान आहे.
राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू असून, मंगळवारी (ता. 14) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी 41.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात अनेक ठिकाणी तापमान चाळीशीपार गेले असून, राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान चाळीशीच्या खाली आले आहे. कोकण, महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार सरींनी हजेरी लावली.
मंगळवारी (ता. 14) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) पुणे 32.9, नगर 39.0, धुळे 34.0, जळगाव 38.3, कोल्हापूर 31.6, महाबळेश्वर 24.5, नाशिक 33.7, निफाड 38.2, सांगली 32.9, सातारा 33.3, सोलापूर 33.3, सांताक्रूझ 34.4, डहाणू 35.6, रत्नागिरी 32.7, औरंगाबाद 34.6, परभणी 37.0, अकोला 37.9, अमरावती 38.0, बुलडाणा 35.9, ब्रह्मपुरी 41.2, चंद्रपूर 39.2, गोंदिया 40.0, नागपूर 40.6, वर्धा 40.0, यवतमाळ 38.5 असे नोंदले गेले आहे.
मंगळवारी (ता. 14) सकाळपर्यंतच्या 24 तासांत राज्याच्या कोकण विभागात लांजा 50, वैभववाडी, मालवण प्रत्येकी 30, रत्नागिरी, देवगड, मंडणगड प्रत्येकी 20. मध्य महाराष्ट्र विभागात मालेगाव 80, जुन्नर 60, नंदूरबार, नेवासा प्रत्येकी 40. मराठवाडा वाभागात पालम, परळी वैजनाथ प्रत्येकी 50, मानवत, मुखेड प्रत्येकी 40, आंबाजोगाई, देगलूर, चाकूर, गंगापूर प्रत्येकी 30, माजलगाव, औरंगाबाद, वाडवणी, पाथरी, कंधार प्रत्येकी 20. तर विदर्भ विभागात जेवती, वणी, झरीझमणी, आष्टी प्रत्येकी 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची नोंद हवामान विभागाकडे आहे.
आज (ता. 15) मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सांगली, सोलापूर. मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड. तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली. या भागात विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
👇 शेतीमित्र मासिकाचे फेसबुक पेज लाईक करा 👇
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 शेतीमित्र मासिकाचे इन्ट्राग्राम पेज जॉईन करा 👇
https://www.instagram.com/shetimitra03/
👇 शेतीमित्रच्या टेलीग्राम ग्रुपमध्ये सहभागी व्हा ! 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग ‘ करा
👇 👇 👇