एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा आज माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते राजभवन येथील पत्रकारपरिषदेत बोलत होते. शिवसेनेचे आमदार, भाजपचा विधीमंडळ गट आणि 16 अपक्ष असे समर्थन या सरकारला असेल, आज संध्याकाळी राज्यपालांनी 7:30 वाजता एकनाथ शिंदे यांना शपथविधीसाठी आमंत्रित केले आहे. असेही यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सेना एकत्र लढली. एकूण 170 लोक निवडून आले होते. साहजिक अपेक्षा होती, भाजप सेना सरकार येईल. त्यावेळीच मुख्यमंत्री भाजपचा असणार होता. मात्र निकालांनंतर आमचे मित्रपक्ष शिवसेना नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली. बाळासाहेबांनी ज्यांचा आजन्म विरोध केला. सावरकरांचा विरोध केला, अशा काँग्रेस राष्ट्रीवादीसोबत युती केली. भाजपला बाहेर ठेवणे हा जनमताचा अपमान होता. जनमत हे भाजप-सेना युतीला होते. असेही फडवणीस यावेळी म्हणाले.
ब्रेकिंग न्यूज : शेतकऱ्यांनी आडवला कृषी आयुक्तांचा ताफा
फडवणीस बाहेर राहून सरकार टिकवणार
गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीच्या माध्यमातून अडीच वर्षांत कोणतीही विकास नाही, नवी योजना नाही. प्रचंड भ्रष्टाचार झाला. महाराष्ट्राच्या इतिहासात दोन मंत्री मनी लॉन्डरिंग प्रकरणी जेलमध्ये जाणे ही खेदजनक बाब होती. ठाकरेंनी दाऊद इब्राहिमला विरोध केला. त्याच्याशी संबंध असण्याचा आरोप असणारा मंत्री जेलमध्ये गेला तरी राजीनामा नाही. शिंदे हे शिवसेनेचे गटनेते आहेत. शिवसेनेच्या आमदारांच्या कुचंबणा होत होती. ज्यांच्याविरोधात लढलो त्यांच्यासोबतच सत्ता स्थापन झाली. या कुचंबणेमुळे त्यांनी बंड केले. या आमदारांपेक्षा ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना महत्व दिले. अशी टिपणी फडवणीस यांनी केली.
महत्त्वाचा सल्ला : खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी सरकारला सहकार्य करावे : केंद्रीय कृषीमंत्र्यांचे आवाहन
एकनाथ शिंदे म्हणाले ?
राज्याचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत. सेनेचे दोन तृतियांशपेक्षा जास्त आमदार माझ्यासोबत आहेत. महाविकास आघाडीत असताना आम्हाला खूप अडचणी आल्या, निर्णय घेता येत नव्हते. पण आता बाळासाहेबांचा विचार आम्ही पुढे नेणार आहोत.
शिवसेनेचे 40 आणि अपक्ष 10 असे एकूण 50 आमदार माझ्यासोबत आहेत. आम्हाला काही स्वार्थ नाही, पदाची लालसा नाही. ही वैचारिक लढाई आहे, बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचाराचा वारसा आम्ही चालवणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
संख्याबळाचा विचार केला तर देवेंद्र फडणवीस हेही मुख्यमंत्री होऊ शकले असते, मात्र त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत बाळासाहेबांच्या शिवसैनिकालाच मुख्यमंत्रीपदी बसवण्याचे काम केले. अर्थात ते स्वतः मंत्रिमंडळात नसले तरी राज्याच्या विकासासाठी ते आपल्यासोबत आहेत. फडणवीस हा फार मोठ्या मनाचा माणूस आहे. स्वतःला मिळत असलेले दुसऱ्याला देण्याची तयारी कोणी दाखवत नाही. माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला त्यांनी राज्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली. हा विश्वास जपण्याचा प्रयत्न आपण करू, असेही शिंदे म्हणाले.
महत्त्वाची बातमी : केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे : नितीन गडकरी
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1