किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडने शेतकऱ्यांसाठी सेल्फ-स्टार्ट पॉवर टिलर तयार केले आहे. या पॉवर टिलरमध्ये के-कुल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर 12 एचपी आणि 15 एचपीचे सेल्फ-स्टार्ट पॉवर टिलर 24 तास काम करू शकतात, असे कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
महा ब्रेकिंग न्यूज : एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री
भारतात पहिल्यांदाच शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्यासाठी पॉवर टिलरला सेल्फ-स्टार्टचा पर्याय देण्यात आलाय. त्याचबरोबर पॉवर टिलरमधील बैठक व्यवस्था तयार करताना शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे. असे किर्लोस्कर ऑइल इंजिन्समधील मेकॅनायझेशन विभागाचे व्यवसाय प्रमुख प्रमोद एकबोटे यांनी सांगितले.
ब्रेकिंग न्यूज : शेतकऱ्यांनी आडवला कृषी आयुक्तांचा ताफा
गेल्या अनेक वर्षांपासून किर्लोस्कर फार्म मशिनरी शेतकऱ्यांना तांत्रिक आणि यांत्रिक सेवा पुरवत आहे. कंपनीने किर्लोस्कर शेत मशिनरी तुमच्या दारी ही मोहीम राबवलीय. शेतीसाठी तयार करण्यात आलेल्या यंत्रे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष वापरून बघता यावीत, हा त्यामागचा हेतु आहे. या मोहिमेत नव्याने तयार करण्यात आलेल्या सेल्फ स्टार्ट पॉवर टिलरचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातील विटा येथे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. सांगली, सातारा जिल्ह्यातील 500 हुन अधिक शेतकरी, पुढारी आणि विविध गावातील सरपंचांनी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
महत्त्वाचा सल्ला : खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी सरकारला सहकार्य करावे : केंद्रीय कृषीमंत्र्यांचे आवाहन
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1