पावसाने ओढ दिल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आज दिली आहे. जुलै महिन्यात दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या तुलनेत 94 ते 106 टक्के मान्सूनचा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे. खरीप पिकांच्या पेरण्यांच्या दृष्टीने जुलै महिना महत्त्वपूर्ण आहे.
आनंदाची बातमी : 24 तास चालणार किर्लोस्करचा नवा पॉवर टिलर
जून महिना देशातील अनेक भागांत जवळपास कोरडा गेला. काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. परंतु देशाच्या मध्य भागात पावसाने दडी मारली. त्यामुळे देशात जून महिन्यात सरासरीच्या आठ टक्के पावसाची तुट राहिली, असे हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले. देशाच्या मध्य भागातील राज्यांमध्ये कापूस, सोयाबीन आणि ऊस या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. या भागात जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत 54 टक्के कमी पाऊस झाला.
यंदा मान्सून नेहमीपेक्षा दोन दिवस आधीच देशात दाखल झाला. केरळमध्ये 29 मे रोजी मान्सून दाखल झाला. परंतु नंतर मात्र त्याची वाटचाल मंदावली. जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण कसं राहतं, यावर शेतीची बरीच गणितं अवलंबून आहेत.
ब्रेकिंग न्यूज : शेतकऱ्यांनी आडवला कृषी आयुक्तांचा ताफा
जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे देशात पेरण्या घटल्या आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडील 30 जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात एकूण 259.61 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरण्यांमध्ये 4.63 टक्के घट आहे. गेल्या वर्षी 272.21 लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या.
महत्त्वाचा सल्ला : खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी सरकारला सहकार्य करावे : केंद्रीय कृषीमंत्र्यांचे आवाहन
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1