भौगोलिक मानांकन प्राप्त वायगाव हळदीची देशपातळीवर ओळख व्हावी, यासाठी टपाल विभागातर्फे विशेष पाकिटाचे अनावरण करण्यात आले. वर्धा जिल्ह्यात मोठ्या क्षेत्रावर उत्पादन होणाऱ्या वायगाव हळदीच्या भौगोलिक मानांकनासाठी वायगाव हळद उत्पादक संघाने पुढाकार घेतला होता. त्या अंतर्गत वायगाव हळदीचा उल्लेख असलेला विशेष टपाल लिफाफा वर्धा येथे प्रकाशित करण्यात आला आहे. टपाल विभागातर्फे एकच वेळी देशात दहा ठिकाणी या लिफाफ्याचे लोकार्पण करण्यात आले.
ब्रेकिंग न्यूज : महावितरणने वीज दरात केली मोठी वाढ
या हळदीचे वैशिष्ट्य म्हणजे गडद रंग आणि कुरकुमीनचे प्रमाण यामध्ये अधिक आहे. ही वैशिष्ट्ये जपल्यामुळेच या हळदीला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले होते. दरम्यान, केंद्र सरकारने देशातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या व देशाची वेगळेपण सिद्ध करणाऱ्या उत्पादनांना टपाल विभागाच्या माध्यमातून देश व जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
मोठी बातमी : स्मार्ट मधील २३१ प्रकल्पांना मान्यता
वायगाव हळदीचा उल्लेख असलेला विशेष टपाल लिफाफा प्रकाशित करण्यात आला आहे. टपाल विभागातर्फे एकच वेळी देशात दहा ठिकाणी या लिफाफ्याचे लोकार्पण करण्यात आले. वर्धा येथे झालेल्या लोकार्पण सोहळ्याला पोस्ट अधीक्षक मूर्ती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर, ब्रह्मानंद पांगुळ, पंकज भगत उपस्थित होते.
ब्रेकिंग न्यूज : विठ्ठला ! जनतेच्या सर्व अडचणी दूर कर : मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1