जून महिन्यातील दडीनंतर जुलै महिन्यातील पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. राज्यात सर्वदूर पाऊस पडत असून, घाटमाथ्यावर दमदार पाऊस पडत असल्याने धरणांमध्ये पाणी जमा होऊ लागले आहे. मराठवाडा, विदर्भात चांगल्या पाऊस पडत असून, काही भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आहे. कोकणात जोर कमी झाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या दोन दिवसांत मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतशिवारात पाणी शिरले आहे. सोयबीनसह खरिपाची पिके पाण्याखाली गेली असून, फळबागांनाही फटका बसला आहे. अनेक ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या आहेत. नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यांत रविवारी सकाळपर्यंत चांगला पाऊस झाला. विदर्भातही अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडला.
आनंदाची बातमी : वायगाव हळदीचे टपाल विभाग करणार ब्रँडिंग
गेल्या दोन दिवसांत मराठवाड्यात पावसाचा जोर कायम असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील अनेक नद्यांचे पाणी शेतशिवारात घुसले आहे. वाशीम जिल्ह्यात शेंदुर्जना, गिरोली येथे अतिवृष्टी झाली आहे. तर अकोला, बुलडाणा जिल्ह्यात हलका पाऊस झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला असून, चांदोलीत मुसळधार पाऊस झाला आहे. दमदार पावसामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. गेल्या दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.
धरण क्षेत्रात समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमध्ये लवकरच समाधानकारक पाणीसाठा होणार आहे. जळगाव, नाशिकसह मध्य महाराष्ट्रात बहुतांशी भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. कोकणात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले.
ब्रेकिंग न्यूज : महावितरणने वीज दरात केली मोठी वाढ
हवामान विभागाच्या आकडेवाडीनुसार रविवारी (ता. 10) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये (मिमी) कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात जव्हार 87, मोखाडा 80. रायगड जिल्ह्यात कर्जत 90, महाड 74, माथेरान 77, रोहा 72, पोलादपूर 72, सुधागडपाली 52. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण 75, खेड 80, लांजा 52, मंडणगड 50, राजापूर 50, संगमेश्वर 74, वाकवली 52. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग 66, सावंतवाडी 151, ठाणे जिल्ह्यात भिवंडी 56, शहापूर 50, ठाणे 51 तर उल्हासनगर येथे 108 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मध्य महाराष्ट्र विभागातील नगर जिल्ह्यात अकोले 41. धुळे जिल्ह्यात शिरपूर 55. जळगाव जिल्ह्यात भाडगाव 46, दहीगाव 93, एरंडोल 53, जळगाव 78, यावल 43. कोल्हापूर जिल्ह्यात आजरा 58, गडहिंग्लज 46, गगणबावडा 56, गारगोटी 45, पन्हाळा 48, राधानगरी 71, शाहूवाडी 129. नंदूरबार जिल्ह्यात अक्कलकुवा 85, अक्रणी 40, नंदुरबार 84, तळोदा 42, नाशिक जिल्ह्यात दिंडोरी 68, हर्सूल 108, इगतपुरी 240, कळवण 44, नाशिक 62, ओझरखेडा 57, पेठ 125, सटाना 53, सुरगाणा 120, त्र्यंबकेश्वर 94. पुणे जिल्ह्यात घोडेगाव 50, भोर 55, जुन्नर 71, राजगुरुनगर 55, लोणावळा 124, पौड 80, वडगाव मावळ 97, वेल्हे 96. तर सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर 174 तर पाटण येथे 74 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मोठी बातमी : स्मार्ट मधील २३१ प्रकल्पांना मान्यता
मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद 62, सोयगाव 71. जालना जिल्ह्यात पातूर 56. लातूर जिल्ह्यात अहमदपूर 33, चाकूर 31, देवणी 31, जळकोट 35, उदगीर 38. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर 41, भोकर 104, बिलोली 66, देगलूर 56, धर्माबाद 116, हदगाव 49, हिमायतनगर 59, कंधार 54, किनवट 103, माहूर 63, मुखेड 51, उमरी 104. उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा 32. तर परभणी जिल्ह्यात मानवत 61, पालम 30, व सेलू येथे 60 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
विदर्भात अमरावती जिल्ह्यात चांदूर रेल्वे 32, चिखलदरा 43, धामणगाव रेल्वे 57, तिवसा 47. भंडारा जिल्ह्यात लाखंदूर 31. चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर 54, गोंडपिंपरी 66, जेवती 75, कोर्पणा 43, मूल 103, पोंबुर्णा 78, राजापूर 41, सावळी 56, वरोरा 66. गडचिरोली जिल्ह्यात अहिरी 130, चामोर्शी 120, एटापल्ली 61, मुलचेरा 206. नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर 48, पारशिवनी 43, सावनेर 65. वर्धा जिल्ह्यात आर्वी 46, आष्टी 45, देवळी 75, हिंगणघाट 66, समुद्रपूर 52, वर्धा 97. वाशिम जिल्ह्यात मानोरा 57. तर यवतमाळ जिल्ह्यात बाभुळगाव 52, कळंब 50, मारेगाव 72, पांढरकवडा 40, राळेगाव 105, वणी 92. झारी झामणी येथे 42 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
ब्रेकिंग न्यूज : विठ्ठला ! जनतेच्या सर्व अडचणी दूर कर : मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1