बीडमध्ये गोगलगायीमुळे पिकांचे मोठे नुकसान

0
348

बीड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी उगवलेल्या सोयाबीनसह अन्य पिकांना गोगलगायींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात गोगलगायींच्या प्रादुर्भावाने उगवलेले सोयाबीन पिकासह इतरही पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, नुकसान झालेल्या या पिकांचे कृषी आणि महसूल यंत्रणेने पंचनामे करुन संबंधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी धनजंय मुंडे यांनी केली

बीड जिल्ह्यात पेरणीनंतर पाऊस काही काळ लांबणीवर होता, मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी पावसाने दमदार हजेरी लावली. याच काळात बीड जिल्ह्यात पेरणी करण्यात आलेल्या प्रमुख पिकांपैकी सोयाबीनचे क्षेत्र गोगलगायींच्या भक्ष्यस्थानी पडले आहे.  

महत्त्वाचा सल्ला : नैसर्गिक शेतीची लोकचळवळ यशस्वी ठरेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

शंखी आणि अन्य प्रकारातील गोगलगायी उगवलेली रोपटी खाऊन नष्ट करत आहेत. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, कार्यशाळा घेतल्या परंतु त्याला खूप उशीर झाला होता. ऐन पेरणीच्या हंगामात तत्कालीन कृषी मंत्री दादा भुसे सहलीवर होते आणि नवीन सरकारमध्ये अद्याप खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. पेरणी करुन 100 टक्के नुकसान झाल्यानंतर आता गोगलगायीचे नियंत्रण करणे आणि दुबार पेरणी करणे असे दुहेरी संकट बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांसमोर आहे.

ब्रेकिंग न्यूज : राज्यात पावसाचा जोर कायम : उद्याही पाऊस !

दरम्यान, गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचं नुकसान आणि प्रशासन करत असलेल्या व्यवस्थापनाची धनंजय मुंडे यांनी रविवारी अंबाजोगाई तालुक्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे आदींकडूनही माहिती घेतली. कृषी आणि महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन त्याचा अहवाल राज्य सरकारला कळवावा. शासनाने दुहेरी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करुन ती तात्काळ उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे.

महत्त्वाची बातमी : राज्यात सर्वदूर पाऊस : मराठवाड्यात पिकांचे नुकसान

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here