राज्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवला असून, धुव्वाधार अतिवृष्टीमुळे बहूतांश जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. राज्यातील सर्वच नद्यांची पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या वस्त्या व शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत. एकूणच या पावसामुळे विविध भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे काही भागातील शाळा आज बंद राहणार आहेत.
ब्रेकिंग न्यूज : नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी : पिके पाण्याखाली
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. या जोरदार पावसामुळे नदी, नाले, ओढे भरून वाहत आहेत. या पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी पूरसदृश परिस्थिती ओढावली आहे. पावसाचा वाढता धोका पाहता प्रशासन सज्ज झाले आहे. खबरदारी म्हणून ठिकठिकाणी आधीच एनडीआरएफची टीम पाठवण्यात आल्या आहेत.
लक्षवेधी बातमी : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील पिकांना फटका
राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड, ऑरेन्ज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशाराही दिला आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज (14 जुलै) शाळा बंद असणार आहेत. यामध्ये पालिका आणि खासगी शाळांचा समावेश आहे. पुण्यात या पावसामुळे कालही शाळांना सुट्टी देण्यात आली होती.
हे नक्की वाचा : रत्नागिरी जिल्ह्यात धुव्वाधार पाऊस
नवी मुंबई, वसई, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळा या आज बंद राहणार आहे. शासनाने शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. महापालिका प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि विद्यालयांना आज गुरुवारी 14 जुलैला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय अतिवृष्टीची परिस्थिती यापुढेही अशीच राहिल्यास शाळेस सुट्टी घेण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापनाला देण्यात आल्याची माहिती शिक्षण उपायुक्त जयदीप पवार यांनी दिली.
आनंदाची बातमी : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान मिळणार : मुख्यमंत्री
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1