महागाईने सर्वसामान्यांचे जीवन त्रासदायक झाले आहे. दैनंदिन गरजेच्या बऱ्याचशा गोष्टी महाग झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागली आहे. यामध्ये पेट्रोल, डिझेल तसेच गॅस सिलेंडर, खाद्यतेल तर किती दिवसापासून महागाईच्या शिखरावर होते. त्याच्यामध्ये आत्ता थोडाफार दिलासा मिळाला असताना, उद्या (ता. 18) पासून महागाई पुन्हा वाढणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात मोठी महागाई वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा आर्थिक बुर्दड शन करावा लागत आहे. आता महागाईने कंबरडे मोडले असताना सामान्यांच्या खिशावर आता आणखी भार पडणार आहे. आता नवीन जीएसटी दर लागू होणार असल्याने, आता सर्वसामान्या याची झळ बसणार आहे. आता सरकारने अनेक नव्या वस्तूंवर जीएसटी लागू केली आहे. त्यामुळे पीठ, दही यासारखे पॅकबंद खाद्यपदार्थ येत्या 18 जुलैपासून महागणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे.
आनंदाची बातमी : आठवड्यात उजनी २५ टक्क्यांवर
उद्यापासून खाणं-पिण्यासह वैद्यकीय उपचारही महागणार आहेत. तसेच अन्नधान्यांवरही जीएसटी लागू होणार आहे. धान्य आणि डाळीच्या किंमतीत 8 ते 10 टक्क्यांनी वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. महागाईचा हा भार ग्राहकांवरच पडणार आहे. यामध्ये आता पॅकमधील दही, पनीर, लस्सी, मध, सोयाबीन, मटार आदी पदार्थांसह मुरमुरेंवर आता पाच टक्के जीएसटी लागू होणार आहे. आतापर्यंत हे पदार्थ जीएसटीबाहेर होते.
तसेच एक हजार रुपयांपेक्षा प्रति दिवस भाडे असणाऱ्या हॉटेल रुम्सवर 12 टक्के जीएसटी लागू होणार आहे. एलईडी लाइट्स आणि लॅम्पच्या किंमतीदेखील वाढवण्याची शक्यता आहे. सरकारने या वस्तूंवरील जीएसटी 12 टक्क्यांहून 18 टक्क्यांवर केली आहे. तसेच सायकल पंप, टर्बाइन पंप आणि सबमर्सिबल पंपांवर आता 18 टक्के टॅक्स आकारला जाणार आहे.
महत्त्वाची बातमी : पीक विम्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नाही : कृषि आयुक्त धीरज कुमार
तसेच वेगवेळ्या मशीनवर 18 टक्के कर आकारण्यात येणार आहे. सोलर वॉटर हिटर्सवरही 12 टक्के GST आकारण्यात येणार आहे. रुग्णालयात रुग्णांसाठींच्या 5000 रुपयांहून अधिक शुल्क असलेल्या खोल्यांसाठी (आयसीयू वगळता) पाच टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनने या जीएसटी विरोधात केंद्र सरकारला पत्र लिहीले आहे. हा जीएसटी तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
जीएसटी कौन्सिलने प्रिंटिंग-ड्रॉइंग शाई, पेन्सिल शार्पनर, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादने, पेपर-कटिंग नाइफ यावरील जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. यामुळे आरोग्यसेवा महागणार, शैक्षणिक वस्तू महागणार आहेत. यामुळे आता सरकारने दिलासा देण्याऐवजी महागाई अजूनच वाढवली आहे.
हे वाचा : ट्रॅक्टर विक्रीमध्ये महिन्यात 15 टक्क्यांनी वाढ
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1