राज्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात पुढील 4 ते 5 दिवस आणखी पाऊस होणार असल्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. ए. होसाळीकर यांनी पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा जोर वाढणार आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने आता विदर्भात पुढील चोवीस तासांत अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जूनमध्ये फार कमी पाऊस पडला होता. परंतु, जुलैला सुरुवात झाल्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. परंतु, आता गेली 8 ते 10 दिवसांपासून पाऊस जोरात आहेच. परंतु, आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या टिप्स : शंखी गोगलगायी नियंत्रणाच्या 13 टिप्स !
मराठवाड्यातसुद्धा जास्त पावसाची शक्यता असून, मुंबई हवामान विभागाकडून पुढील 4 ते 5 दिवस पाऊस होणार असल्याचे सांगितल्याने काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होणार आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
ब्रेकिंग न्यूज : गोदावरी, प्राणहिता नद्या तुडुंब : सतर्कतेचा इशारा
मुंबई, कोकण, पुणे, नाशिक या भागात पावसाचा जोर सुरूच असताना. पुन्हा एकदा हवामान खात्याने काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह राज्यामध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाची सुरूच आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली, या ठिकाणी मागील काही दिवसांत अतिवृष्टीदेखील झाली.
आनंदाची बातमी : जायकवाडी धरण 63 टक्क्याच्यावर
राज्यात जुलैच्या सुरुवातीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. राज्याच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण झालीय. आतापर्यंत या पावसात 99 जणांचा बळी गेलाय. तर 181 जनावरे दगावली आहेत. तर आजवर 8 हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. आज पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. रायगड, पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रत्नागिरीमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तिकडे गुजरातमध्येही पावसाने विश्रांती घेतल्याने पूर ओसरला आहे. परिणामी मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पाणी कमी झाले आहे..
आनंदाची बातमी : अमरावती येथील रविंद्र मेटकर यांना जगजीवन राम अभिनव किसान राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
गेल्या आठवड्यात मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला होता. मात्र मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी मुंबईवर बरसत असल्या तरी, राज्याच्या विविध भागांमध्ये होत असणाऱ्या मुसळधार पावसाच्या तुलनेने मुंबई पावसाची संततधार नव्हती. मात्र, पुढील दोन दिवस पुन्हा एकदा मुंबई, मुंबई उपनगरात आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
ब्रेकिंग न्यूज : उद्यापासून महागाई वाढणार ? काय काय महागणार ?
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1