माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा सहकारातील मोठा अनुभव लक्षात घेता केंदीय मंत्री अमित शहांच्या सहकार मंत्रालयाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने मंगळवारी शरद पवार यांची नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सहकार क्षेत्रातील अनुभव सांगण्याची आणि सहकार मंत्रालयाचे कामकाज प्रभावीपणे चालण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्याची विनंती या शिष्टमंडळाने पवार यांना केली आहे.
आनंदाची बातमी : अतिवृष्टीग्रस्त ‘या’ दहा जिल्ह्यांना 33.64 कोटींचा निधी मंजूर
माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी अनेक वर्षे सहकार क्षेत्रात प्रभावी काम केले आहे. अनेक सहकारी संस्था चालवण्यात आणि उभा करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांचा अनुभवाचा देशाच्या सहकार मंत्रालयाला फायदा व्हावा या उद्देशाने सहकार मंत्रालयाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने त्याचं ही भेट घेतली आहे. या भेटीची माहिती खुद्द शरद पवार यांनी स्वत:च्या फेसबुक पेजवरून दिली आहे.
सहकार क्षेत्रातील अनुभव सांगण्याची आणि सहकार मंत्रालयाचे कामकाज प्रभावीपणे चालण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्याची विनंती मंत्रालयाच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांना यावेळी केली. यामुळे आता देशाचे सहकारविषयक धोरण आणि निर्णय घेण्यासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयास मार्गदर्शन करणार आहेत.
महत्त्वाची बातमी : ट्रॅक्टर अनुदान योजनेत ‘हा’ केला मोठा बदल
यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच होणार आहे. सहकार मंत्रालयाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन शरद पवार यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले आहे. हे मंत्रालय नवीनच स्थापन करण्यात आले आहे. अमित शहा हे या खात्याचे मंत्री आहेत. या भेटीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली आहे.
या शिष्टमंडळात ज्ञानेशकुमार, सहसचिव पंकज कुमार बन्सल, उपसंचालक श्रीमती सुचेता, मुख्य संचालक ललित गोयल यांचा समावेश होता. सरकार हा अनेकांच्या जीवनाशी संबंधीत विषय आहे. अनेक शेतकरी आणि कष्टकरी लोक यावर अवलंबून आहेत. गेल्या काही दिवसांपासून सहकार मोडीत निघण्याची भीती देखील व्यक्त केली जात होती.
महत्त्वाची बातमी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. इंद्र मणी मिश्रा
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1