राज्यातील साखर कारखान्यांनी संपलेल्या ऊस गाळप हंगामात शेतकर्यांच्या बँक खात्यावर एफआरपीचे तब्बल 31 हजार कोटी रुपये जमा केलेले असल्याची माहिती साखर आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली असून, एफआरपीची रक्कम थकीत ठेवल्याप्रकरणी राज्यातील पाच कारखान्यांवर जप्तीच्या कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
ब्रेकिंग न्यूज : अमित शहांच्या सहकार मंत्रालयास शरद पवारांचे मार्गदर्शन
यंदा राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. अतिरिक्त उसामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांचे ऊस शिल्लक राहिले, तर काही शेतकऱ्यांनी आपले ऊस पेटवून दिले. असे झाले असल्याने एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा विषय झाला आहे.
शेतकर्यांना देय एफआरपीचा थकित आकडा 1 हजार 536 कोटी 19 लाख रुपये असून या देय रकमेचे हे प्रमाण 3.16 टक्क्यांइतके आहे. यंदा हंगामात एकूण 200 साखर कारखाने सुरू होते. त्या पैकी काही कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक रक्कम शेतकर्यांना दिलेली आहे. मात्र असे कारखाने बोटावर मोजण्या इतकेच आहेत. राज्यातील 90 साखर कारखान्यांनी शेतकर्यांना एफआरपीची शंभर टक्के रक्कम दिलेली आहे. तर 99 कारखान्यांनी 80 ते 99 टक्के रक्कम दिली आहे. 7 कारखान्यांनी केवळ 60 ते 79 टक्के रक्कम दिली आहे. तर 4 कारखान्यांनी शून्य ते 59 टक्के रक्कम दिलेली आहे. साखर आयुक्तालयाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
आनंदाची बातमी : अतिवृष्टीग्रस्त ‘या’ दहा जिल्ह्यांना 33.64 कोटींचा निधी मंजूर
उस एफआरपीची एकूण देय रक्कम 32 हजार 82 कोटी 62 लाख रुपये होती. त्यापैकी 31 हजार 68 कोटी 49 लाख रुपये शेतकर्यांना देण्यात आलेले आहेत. असे असले तरी अजून 110 कारखान्यांकडून एफआरपीची रक्कम देणे बाकी आहे.
एफआरपीची रक्कम थकीत ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्तालयाने पाच कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश संबंधित जिल्हाधिकार्यांना दिलेले असून, त्या कारखान्यांमध्ये सोलापूर सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी, ता. पंढरपूर. पुणे राजगड सहकारी, निगडे, ता. भोर. बीड अंबाजोगाई सहकारी, ता. अंबाजोगाई, बीड वैद्यनाथ सहकारी, ता. परळी. उस्मानाबाद जयलक्ष्मी शुगर प्रो. नितळी. या कारखान्यांचा समावेश आहे.
महत्त्वाची बातमी : ट्रॅक्टर अनुदान योजनेत ‘हा’ केला मोठा बदल
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1