एकीकडे पावसामुळे मोसंबीला गळती लागली असतानाच दुसरीकडे बाजारात मोसंबीचे दर मोठ्याप्रमाणावर पडले आहे. पाचोड (औरंगाबाद) येथील मोसंबी मार्केटमध्ये आवक वाढताच मोसंबीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आठवड्यात मोसंबीचे दर 23 हजारांहून 12 हजारांवर आल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना एका टनामागे तब्बल दहा हजार रुपये आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
मोठा निर्णय : द्राक्ष बागाईतदार संघाचा दोन संस्थांशी संशोधन करार
गेल्या काही वर्षात पाचोड येथील मार्केटमध्ये मोसंबीची आवक वाढली आहे. सध्या राज्यभरातील प्रमुख बाजारांपैकी एक महत्वाची बाजार म्हणून या मार्केटकडे पहिले जात आहे. पाचोडच्या गोड व रसवंत मोसंबीला दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, जयपूर, कानपूर, हैद्राबाद, कर्नाटक, कलकत्ता, मुंबई, पुणेसह परदेशात देखील मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे येथील मोसंबी खरेदीला परराज्यातील व्यापारी ठाण मांडून असतात. तर औरंगाबाद, जालना, बीडसह इतर जिल्ह्यातील शेतकरी या बाजारात माल विकण्यासाठी आणतात.
मोठी बातमी : अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला जीआय मानांकन
गेल्या तीन वर्षांपासून कोरोना आणि अतिवृष्टीचा मोठा फटका मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. मात्र यंदा मोसंबी बागांना चांगला माल बहरला होता शिवाय मार्केटमध्ये देखील चांगला भाव मिळत होता. त्यामुळे पाचोडच्या मार्केटमध्ये मोठी आवक वाढली होती. गेल्या आठवड्यात तब्बल 23 हजाराचा भाव मिळाला होता. मात्र आवक मोठ्याप्रमाणावर वाढल्याने हे दर शुक्रवारी अचानक कोसळले. त्यामुळे मोसंबीचे दर 23 हजारांहूनथेट 12 हजारांवर पोहचला आहे. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना एका टनामागे तब्बल दहा हजार रुपये आर्थिक नुकसान सोसावे लागले.
यंदा मोसंबीचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर झाले आहे. त्यामुळे बाग विक्रीची मागणी वाढली आहे. याचाच फायदा व्यापारी घेतांना दिसत आहेत. बाग खरेदी करतांना व्यापारी मागेपुढे करत असून, दर तोडून मागत आहेत. मोठी आवक वाढल्याने दर कोसळले आहे.
हे नक्की वाचा : जिरायतीला हेक्टरी 50 हजार अन् बागायतीला 1 लाखाची मदत द्या : जयंत पाटील
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1