जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणावर बसला असल्याचे, प्रशासनाच्या प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. मराठवाड्यातील 3 हजार 640 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून, पावणेचार लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान सव्वा लाख हेक्टरचे पंचनामे झाले असून, अजूनही अडीच लाख हेक्टरचे पंचनामे बाकी आहेत. तर मराठवाड्यातील 6 लाख 21 हजार शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे.
महत्त्वाची गोष्ट : पावसाळ्यात जनावरांची अशी घ्या काळजी
जालना जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या 377 असून 255.74 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. तर बाधित गावांची संख्या 1 आहे.
परभणी जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या 1500 असून, 1 हजार 200 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. तर बाधित गावांची संख्या 3 आहे.
हिंगोली जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या 85,600 असून, 76 हजार 771 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. तर बाधित गावांची संख्या 62 आहे.
नक्की वाचा : पीकविमा योजनेसाठी 35 लाख शेतकऱ्यांचे अर्ज
नांदेड जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या 5,33,384 असून, 2 लाख 98 हजार 861.17 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. तर बाधित गावांची संख्या 1570 आहे.
बीड जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या 58 असून, 26.80 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. तर बाधित गावांची संख्या 1 आहे.
लातूर जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या 775 असून, 1 हजार 640.57 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. तर बाधित गावांची संख्या 8 आहे. तर औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीचा नुकसानी योग्य फटका बसलेला नाही.
जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी पाहता विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना दिलासा देण्यासाठी तत्काळ विधीमंडळाचे अधिवेशन बोलवण्याची मागणीही अजित पवार यांनी केली आहे.
हे नक्की वाचा : खरीप कांद्यावर थ्रिप्सचे नवीन संकट !
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1