निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसलेला आहे. त्यामुळे कर्जाचा डोंगर आणि नापिकी यामुळे गेल्या 24 दिवसांच्या काळात मराठवाडा विभागात 54 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेती उत्पादन वाढीसाठी शाश्वत उपाययोजनेचा आभाव आणि निसर्गाचा लहरीपणा अशा दुहेरी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. यामुळे मात्र शिंदे सरकारची आत्महत्यामुक्त महाराष्ट्र ही घोषणा हवेतच विरली आहे.
आनंदाची बातमी : नाथसागर 90 टक्के भरले
शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन शिंदे सरकारकडून एक ना अनेक घोषणा होत आहेत. प्रत्यक्षात मात्र, अंमलबजावणीकडे कायम दुर्लक्ष होत आहे. राज्यात सत्तांतर होत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर आत्महत्यामुक्त महाराष्ट्र हे घोषवाक्य घेऊन शेतकऱ्यांसाठी काम केले जाणार असल्याचे सांगितले होते. पण वास्तव चित्र हे वेगळे आहे. शिंदे सरकारची स्थापना होऊन 24 दिवस उलटले आहेत. या कालावधीत राज्यात तब्बल 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या करुन जीवन संपवले आहे.
एकीकडे सत्ता स्थापनेचा खेळ सुरु होता तर दुसरीकडे राज्यातील बळीराजा हा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत होता. अतिवृष्टी, पूर अशी परस्थिती ओढावली असताना अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये पंचनाम्यांना देखील सुरवात झालेली नाही. नापिकी, कर्जबाजारीपणा यातून नैराश्य आल्याने शेतकऱ्यांना हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.
ब्रेकिंग न्यूज : मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा फटका
निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. मराठावाड्यानंतर यवतमाळमध्ये 12 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जळगाव 6, बुलाडाणा 5, अमरावती 4, वाशिम 4, अकोला 3 तर चंद्रपूर-भंडारामध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
राज्यातील शेतकरी संकटात येऊ नये म्हणून मोठे निर्णय घेत आहोत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये त्यासाठी देखील मार्ग काढला जात आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा, यासाठी सरकार कटीबध्द आहे. एवढेच नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांचे जीवन बदलले पाहिजे. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र हा संकल्प करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, गेल्या 24 दिवसांमधील चित्र हे वेगळे असून, राज्यातील 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
महत्त्वाची गोष्ट : पावसाळ्यात जनावरांची अशी घ्या काळजी
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1