येणाऱ्या साखर हंगाम 2022-23 (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी उसाला प्रतिटन 3050 रुपये एफआरपी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. त्यामुळे आता एफआरपीमध्ये प्रतिटन 150 रुपयांनी वाढ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महत्त्वाची बातमी : कापसाचा पीए 837 सरळ वाण विकसित
गेल्या हंगामात 10 टक्के साखर उताऱ्यासाठी 2900 रुपये एफआरपी होती. आता 10.25 टक्के साखर उताऱ्यासाठी 3050 रुपये (वाहतूक खर्चासहित) मिळणार आहेत. दरम्यान एफआरपीमध्ये उसाच्या रास्त व किफायतशीर भावात (एफआरपी) वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे .
गेल्या वर्षीच्या तुलनेत उसाच्या एफआरपीत 2.6 टक्के वाढ झाली आहे. यंदाच्या एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या साखर हंगामासाठी ही एफआरपी लागू करण्यात येणार असून, प्रत्येक 0.1 टक्का वाढीव उतारा मागे प्रतिटन तीन हजार पन्नास रुपये वाढीव तर प्रत्येक 0.1 टक्का कमी उतारामागे प्रतिक्विंटल तीन हजार पन्नास रुपये कमी भाव मिळेल. मात्र साखर उतारा हा साडे नऊ टक्क्यांच्या खाली घसरल्याने भावात आणखी कपात केली जाणार नाही.
हे नक्की वाचा : राज्यातील आठ मिश्र खत उत्पादकांना नोटीसा
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी सरकारने मागील आठ वर्षात उसाच्या या एफआरपीत एकंदरीत 34 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यासोबतच साखर उताऱ्याचा बेस रेट देखील 9 टक्क्यांवरून 10.25 टक्क्यांवर नेण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 2021-22 च्या हंगामात एफ आर पी 2900 रुपये होती तर उसाचे उत्पादन 3530 लाख टन होते यातून ऊस उत्पादकांना एक लाख 15 हजार 196 कोटी रुपये मिळाले होते. जरी आता प्रत्यक्षात एफआरपीत दीडशे रुपये वाढ दिली असली तरी साखर उताऱ्याचा बेस 10 टक्क्यांवरून 10.25 टक्के करण्यात आल्यामुळे दहा टक्के उतार्याच्या आधार गृहीत धरला तर शेतकऱ्याच्या हातात फक्त 112 रुपये 50 पैसे प्रति टन वाढीव मिळणार आहेत.
मान्सून अपडेट : जुलै महिन्यात गेल्या 10 वर्षातील विक्रमी पावसाची नोंद
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1