महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून उसंत घेतलेल्या पावसाने दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरुवात केली. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मागील तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तर काही जिल्ह्यात पावसाने धुव्वाधार हजेरी लावली आहे. आजही अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे.
हे नक्की वाचा : यंदा 92 लाख शेतकऱ्यांचा भरला पीकविमा
आज मुंबई आणि पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढचे दोन ते तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. सध्या राज्यात बहूतांश ठिकाणी नद्या, ओढे आणि नाले ओसंडून वहात आहेत. त्यामुळे प्रशासनावरील दबाव वरचेवर वाढत आहे. पुढचे दोन ते तीन दिवस नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महत्त्वाची घोषणा : महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यावर भर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हवामान विभागाने येत्या तीन दिवसासाठी पालघर, रायगड, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या सात जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर कोल्हापूर, सातारा, नांदेड, अमरावती, ठाणे मुंबई, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. याठिकाणी आजही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, पुढचे दोन ते तीन दिवस सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महत्त्वाची बातमी : इलेक्ट्रिसिटी 2022 विधेयकास संयुक्त किसान मोर्चाचा विरोध : देशव्यापी आंदोलनाचा इशारा
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1