मार्च, एप्रिल, मे महिन्यात उष्णेतेच्या लाटेचा गहू पिकाला बसलेला फटका आणि सध्या गव्हाला होत असलेली मागणी यामुळे गव्हाच्या किंमतीत सध्या चांगली वाढ होत आहे. सप्टेंबरपर्यंत बाजारात गव्हाच्या किंमतीत आणखी 10 ते 15 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
आनंदाची बातमी : यंदा हळदीची विक्रमी 2 लाख टन निर्यात शक्य
मध्यंतरी 14 मे रोजी सरकारने निर्यातीवर अचानक बंदी घातली होती. त्यानंतर गव्हाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. गहू हे जगातील एक प्रमुख अन्नधान्याचे पीक असून, त्याच्या लागवडीचे क्षेत्र व उत्पादन इतर अन्नधान्याच्या पिकांपेक्षा अधिक आहे. भारतातील गव्हाखालील एकूण क्षेत्रापैकी 30 टक्के क्षेत्र बागायती असून, ते मुख्यत: पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यात असून, गव्हाच्या किंमतीत वाढ होत असल्याने गहू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
ब्रेकिंग न्यूज : असे असेल संभाव्य खाते वाटप ? कृषी खाते पुन्हा दादा भूसे यांच्याकडे
गेल्या 15 दिवसात देशभरात गव्हाच्या किंमती 300-350 रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली आहे. नजीकच्या काळात किंमती स्थिर राहण्याची शक्यता कमी आहे. याबाबतची माहिती रोलर फ्लोअर मिलर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अंजनी अग्रवाल यांनी दिली आहे. किंमती जर कायम राहिल्या आणि एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेल्या तर सरकार हस्तक्षेप करण्याची देखील शक्यता आहे.
सप्टेंबरपर्यंत खुल्या बाजारात गहू विक्री योजनेचे कोणतेही धोरण अपेक्षित नाही. सप्टेंबरनंतर पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरु ठेवण्याच्या निर्णयानंतर सरकार विक्रीचा विचार करेल, असशी माहिती गिरणी कामगारांनी दिली आहे. तोपर्यंत गव्हावरील आयात शुल्क काढून टाकणे, ही एकमेव धोरणात्मक घोषणा अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नक्की वाचा : पावसामुळे भाज्या महागल्या
मागील आठवड्यात देखील देशात गव्हाच्या किंमतीत चांगली वाढ झाली होती. उष्णेतेच्या लाटेचा गहू पिकाला बसलेला फटका आणि सध्या गव्हाला होत असलेली मागणी यामुळे किंमती वाढ होत आहे. गव्हाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी पुरवठा कमी होत असल्याने गव्हाच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, बहुतेक शेतकऱ्यांनी त्यांच्या गव्हाची विक्री केली आहे. मात्र, मोठ्या व्यापाऱ्यांकडे सध्या गव्हाचा साठा शिल्लक आहे.
सध्या बाजारपेठेत गव्हाची मागणी वाढली आहे. मागणी वाढली तरी पुरवठा मात्र, कमीच आहे. त्यामुळे गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे. सध्या स्थानिक बाजारात गव्हाच्या किंमती या 23 हजार 547 रुपये प्रति टनावर पोहोचल्या आहेत. गव्हाला मिळणारा हा दर विक्रमी असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, 14 मे रोजी सरकारनं निर्यातीवर अचानक बंदी घातली होती. त्यानंतर गव्हाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे.
मान्सून अपडेट : सावधान ! 7 जिल्ह्यांत रेड अलर्ट
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1