राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर कॅबिनेट बैठकीत राज्य शासनाने पूरग्रस्तांसाठी अतिशय महत्त्वपू्र्ण निर्णय घेतला. दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत तसेच एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्यानुसार आता पूरग्रस्तांना 13 हजार 600 रुपये हेक्टरी मदत दिली जाणार आहे.
महत्त्वाची बातमी : जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे पुन्हा उघडले
राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. याबाबत पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी आपले मंत्रिमंडळ हे लोकांच्या हितासाठी आणि अगदी शेवटच्या घटकापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी प्रयत्न करेल, असे सांगून राज्यभरात जो काही मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये जवळपास पंधरा लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी विशेष बाब म्हणून एनडीआरएफचे निकषांपेक्षा दुप्पट मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे.
ब्रेकिंग न्यूज : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून
जर अगोदर आपण एनडीआरएफचे निकषाप्रमाणे मदतीचा विचार केला तर शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार आठशे रुपये मदत दिली जात होती परंतु आता राज्य सरकारने यामध्ये वाढ करता नुकसानग्रस्तांना 13 हजार 600 रुपये हेक्टरी मदत देण्याचे जाहीर केले.
लक्षवेधी बातमी : गव्हाच्या किंमती वाढणार
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1