गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची नोंद ही मोबाईवर करण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली होती. यंदा त्यामध्ये अमूलाग्र बदल करण्यात आले असून 1 ऑगस्टपासून मोबाईल अॅपही बदलण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना चार पिकांचा समावेश करता येणार आहे. यामध्ये एक मुख्य आणि तीन दुय्यम पिकांचा सहभाग राहणार आहे.
अतिमहत्वाची बातमी : कोरोनाचा धोका पुन्हा वाढला
शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्याची नोंद शासन दरबारी व्हावी या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या ‘ई-पीक पाहणी’ या अॅपमध्ये यंदापासून अमूलाग्र बदल करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना ‘ई-पीक पाहणी’ व्हर्जन – 2 हे मोबाईल अॅप डाऊनलोड करुन घ्यावे लागणार आहे. स्थानिक पातळीवरुन आलेल्या सूचनांच्या आधारे हा बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे यंदा सुरु असलेली प्रक्रिया ही सुटसुटीत असून शेतकऱ्यांना अगदी सहज वापर करता येईल अशी आहे. शेतकऱ्यांना प्ले-स्टोअरवरुन हे मोबाईल अॅप डाऊनलोड करुन घ्यावे लागणार आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या पिक पेऱ्याची नोंद शासन दरबारी व्हावी, हाच उद्देश होता पण आता पीकविमा योजनेतही सरकारी कंपनी असल्याने नुकसान भरपाईसाठीही या अॅपचा आधार घेतला जाणार का हे पहावे लागणार आहे.

ब्रेकिंग : पूरग्रस्तांना हेक्टरी 13 हजार 600 रुपये मिळणार
गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची नोंद ही मोबाईवर करण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली होती. यंदा त्यामध्ये अमूलाग्र बदल करण्यात आले असून 1 ऑगस्टपासून मोबाईल अॅपही बदलण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना चार पिकांचा समावेश करता येणार आहे. यामध्ये एक मुख्य आणि तीन दुय्यम पिकांचा सहभाग राहणार आहे. यापूर्वीचे मोबाईल अॅप हे बंद कऱण्यात आले असून शेतकऱ्यांना यंदा त्या संबंधित गटामध्येच जाऊन माहिती भरावी लागणार आहे. शिवाय चुकीची माहिती अदा केली तर अॅप ते स्विकारत नाही.
महत्त्वाची बातमी : जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे पुन्हा उघडले
शेतकऱ्यांना पिकांची माहिती अगदी सहज आणि सुलभ व्हावी या दृष्टीकोनातून हे अॅप तयार करण्यात आले आहे. यामध्ये एक मुख्य आणि तीन दुय्यम पिकांचा समावेश करता येणार आहे. दुय्यम पिकांच्या लागवडीचा दिनांक हंगाम व क्षेत्र नोंदवण्याचीही देखील सोय करण्यात आली आहे. त्यामुळे दुय्यम पिकांची अचूक माहिती मिळण्यासही मदत होते. शिवाय शेतकऱ्यांना माहिती भरताना अडचणी निर्माण झाल्या तर त्याचे निराकरण करण्यास अॅपमध्येच बटन देण्यात आले आहे. जेणेकरुन नेहमी विचारले जाणारे प्रश्नांची उत्तरेही तिथे असणार आहेत.
ब्रेकिंग न्यूज : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून
या मोबाईल अॅपमध्ये कायम पडिक क्षेत्र, बांधावरची झाडी, पिकांची माहिती, गावाची माहिती, गावाची पीक पाहणी इत्यादीची माहिती देणारे ऑडिओ क्लिप त्यामध्ये असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माहिती भरताना अडचणी निर्माण होणार नाही. शिवाय अडचणी निर्माण झाल्या तरी त्य सोडवायच्या कशा याचा फॉर्म्युलाही अॅपमध्येच असणार आहे.

पिकांसंदर्भात माहिती भरताना शेतकऱ्यांकडून अनेकवेळा चुकाही होतात. मात्र, चुकलेली माहिती दुरुस्त कशी करावी यासंदर्भात गतवेळच्या अॅपमध्ये कोणतिही सोय नव्हती. पण आता नोंदवलेली माहिती जर चुकीची असेल तर शेतकऱ्यांना एकवेळ दुरुस्त करण्याची संधी असणार आहे. मात्र, दुसऱ्यांदा माहिती भरताना योग्य ती काळजी घ्यावीच लागणार आहे. शिवाय यासाठी कृषी सहायकांचे मार्गदर्शन घेणेही गरजेचे आहे.
ब्रेकिंग न्यूज : अतिवृष्टीग्रस्तांना राज्य शासनाचा मोठा दिलासा

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1













Users Today : 12
Users Last 30 days : 765
Users This Month : 90
Users This Year : 802
Total Users : 236251