नैसर्गिक संकट, बाजारभाव आणि महागाई यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापला आहे. मात्र राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष तीव्र करण्याचा ठराव किसान सभेने घेतला आहे. मिरज (सांगली) येथे नुकत्याच झालेल्या जिल्हा अधिवेशनात सरकारच्या विरोधात आक्रमक होण्याचा हा निर्णय घेण्यात आला.
या अधिवेशनाला किसान सभेचे राज्याचे अध्यक्ष किसन गुजर, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले आणि राज्य कोषाध्यक्ष उमेश देशमुख उपस्थितीत होते.
ब्रेकिंग : सुधारित आदेश : अतिवृष्टीच्या मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार ?
दरम्यान, यावेळी दुधाला एफआरपी लागू करावी या प्रमुख मागणीसह राज्यातील इनाम वर्ग 3 च्या वक्फ बोर्डाच्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात, ऊस एफआरपीचे तुकडे पाडू नयेत, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीचे मदत द्यावी, सांगली, सातारा व कोल्हापूर भागातील महामार्गासाठी अधिग्रहण केलेल्या जमिनीची भरपाई शेतकऱ्यांना द्यावी, धर्माचा राजकारणातील उपयोग बंद करावा, आदी मागण्या या अधिवेशनात करण्यात आल्या.
अनेक समस्येमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. असे असताना आता दुधाला एफआरपी लागू करावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी सातत्याने करत आहेत. मात्र राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे देखील हाल सुरू आहेत. कारखानदार आणि मंत्री संगनमताने ऊस एफआरपीचे तुकडे पाडण्याच्या विचारात आहेत. राज्यातील देवस्थान इनाम वर्ग 3 च्या वक्फ बोर्डाच्या शेत जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्याची मागणी होत आहे मात्र याचा देखील निर्णय अजून झाला नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना केवळ पोकळ आश्वासन देऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यात दहीहंडी फोडण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे किसान सभा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक पावित्रा घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
महत्त्वाची बातमी : गोगलगायीचा प्रादुर्भाव पीक विमा नियमात बसविण्याबाबत प्रयत्नशील : कृषीमंत्री सत्तार
दरम्यान, आगामी काळात किसान सभेचे कार्य पुढे नेण्यासाठी यावेळी सोळा जणांची जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. शेतकरी नेते उमेश देशमुख यांची किसान सभेचे जिल्हाध्यक्ष म्हणून तर गुलाब मुलानी यांची जिल्हा सचिव म्हणून निवड करण्यात आली. यावेळी माकपच्या जिल्हा सचिव रेहाना शेख, आशा संघटनेचे हनुमंत कोळी, मीना कोळी, एसएफआय संघटनेचे तुळशीराम गळवे यांच्यासह यावेळी शेतकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्रेकिंग न्यूज : जिल्हा बँका राज्य बँकेत विलीनीकरणाच्या हालचाली ?
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1