यंदा अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, या अतिवृष्टीचा मोठा फटका पिकांना बसला आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मोर्शी-वरुड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी काल अमरावती-नागपूर महामार्गावरील हिवरखेड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
महत्त्वाची बातमी : गव्हाच्या किंमतीत वाढ : अजून वाढ होणार ?
यंदा राज्याच्या जुलै व ऑगस्ट महिन्यात विविध भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भाला या अतिवृष्टीचा खूप मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यानच्या काळात मोर्शी तालुक्यातही अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले असून, मोर्शी-वरुड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी आज हा रस्ता रोको करण्यात आला.
शेतकऱ्यांना पत्र : रडायचं नाही, लढायचं… अशा शब्दात मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना दिलासा
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून त्याचाच भाग म्हणून आज मोर्शीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी दुष्काळ जाहीर करावा या मागणीबरोबरच संत्र्याला हेक्टरी एक लाख रुपये मदत करावी, तसेच खरीप पिकासाठी हेक्टरी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी, अशी मागणी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते.
मोठी बातमी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतीसाठी जाहीर केले हे महत्वपूर्ण निर्णय
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1