राज्यात सध्या काही जिल्ह्यात संततधार पाऊस तर काही जिल्ह्यात उन्हाच्या झळा पहावयास मिळत आहेत. सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरूच आहे. आजपासून पुन्हा काही जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मोठी बातमी : कृषी सहायकांच्या रिक्त पदांमुळे कृषी खात्याचा कारभार खिळखिळा : 1757 पदे रिक्त
सध्या काही जिल्ह्यातील पाऊस थांबला असला तरी काही ठिकाणी पावसाची संततधार सुरूच आहे. या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत किंचीत वाढ आहे. काही भागात पावसाने उघडीप दिल्याने समाधान व्यक्त होत आहे. आज (ता. 25) पुन्हा विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान, देशातील राजस्थान आणि परिसरात कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम होणार असून, अजमेर, शिवपुरी, सिधी ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाच्या पट्टयाचा प्रभाव असल्याने जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. त्यामुळे कोकणातील घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस होत आहे. हा पाऊस भात पिकाला पोषक असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
हे वाचा : स्वाभिमानी संघटनेचा मोर्शीत रास्ता रोको
राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान होत असले तरी अनेक भागांत मुख्यतः पावसाची उघडीप असल्याचे चित्र आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्याकडील भागात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. 25) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडीपीसह हलक्या सरींची शक्यता आहे. कमाल तापमान आणि उकाड्यातही वाढ झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजपासून विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या काही जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी लागणार आहे. असे अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महत्त्वाची बातमी : गव्हाच्या किंमतीत वाढ : अजून वाढ होणार ?
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1