जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा फटका बसलेल्या राज्यातील 26 जिल्ह्यांतील सुमारे 22 लाख 89 हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मदत मिळणार आहे. जुलै महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये तब्बल 18 लाख 21 हजार हेक्टर शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे.
महत्त्वाची बातमी : शेतकरी नेते पाशा पटेल यांचे पुत्र ॲड. हसन पटेल यांचे निधन
जुलै महिन्यात नुकसान झालेल्या शेती पिकाचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर कृषी विभागाने यासंदर्भातील अहवाल सरकारला सादर केला आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात नुकासान भरपाई देण्यात येणार आहे.
अतिवृष्टीमुळे जुलै महिन्यात राज्यातील 26 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, हिंगोली, लातूर, नांदेड, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या 26 जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यातील 18 लाख 21 हजार हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले आहे. जवळपास 22 लाख 89 हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून, या सर्व शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे.
मोठी बातमी : पावसाळी अधिवेशनात झाले 10 विधेयके मंजूर व 26 महत्त्वापूर्ण निर्णय
आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळे राज्यातील 81 लाख 2 हजार हेक्टर जमीन बाधीत झाली आहे. यामध्ये जिरायती क्षेत्र 17 लाख 59 हजार 633 हेक्टर असून, बागायती क्षेत्र 25 हजार 476 हेक्टर आहे. फळ पिकांमध्ये 36 हजार 294 हेक्टर एवढे क्षेत्र बाधित झाले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
महत्त्वाची माहिती : आज बैल पोळा, सर्जाराजाचा सण
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1