शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार पितृपक्ष संपल्यावर नवरात्र उत्सवामध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे, 26 सप्टेंबर विस्तार करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इच्छुकांना सांगितले.
मोठी बातमी : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार 3,501 कोटी
नुकतच मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम घेतला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मंत्री होण्यासाठी इच्छुक असलेल्या आमदारांच्या गटाची वेगळी बैठक घेतली. त्यावेळी सर्व इच्छुक मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी इच्छुक आमदारांच्या मतदारसंघातील माहिती जाणून घेतली. दरम्यान, दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाली असून, आता लवकरच याची घोषणा केली जाणार आहे.
10 सप्टेंबरला दुपारपासून पितृपक्ष सुरू होत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार करता येणार नाही. पितृपक्ष संपल्यावर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी 26 सप्टेंबर किंवा 27 सप्टेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे आश्वासन शिंदे यांनी मंत्री होण्यासाठी इच्छुक असलेल्या आमदारांना दिले असून, त्याचबरोबर याच महिन्यात राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादीही पूर्ण होणार आहे. त्या यादीतील नावे देखील जाहीर केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
मोठी निर्णय : अखेर कृषी सहायकांच्या आंदोलनाला यश
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना संधी न मिळाल्यामुळे कमालीचे नाराज झाले होते. त्यामुळे दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. याच बरोबर जालन्याचे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर, संभाजी पाटील निलंगेकर, हर्षवर्धन पाटील, बबनराव लोणीकर, बबनराव पाचपुते, राणा जगजितसिंह यांच्यासह जवळपास 50 जणांची नावे चर्चेत आहेत. परंतु मंत्रिमंडळाची संख्या पाहता यातील अर्ध्याच नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसह एकूण 43 मंत्र्यांचे जम्बो मंत्रिमंडळ असणार आहे.
मोठी बातमी : थेट सरपंच : 1166 ग्रामपंचायतींची 13 ऑक्टोबरला निवडणूक
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1