राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी 3 हजार 501 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असून, सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. भरपाईची ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा होणार आहेत.
महा ब्रेकिंग न्यूज : अखेर ठरला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त
जुलै महिन्यात राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. सलग महिनाभर पाऊस लागून राहिला होता. त्यामुळे सोयाबीन, उडीद आणि मूगाचे मोठे नुकसान झाले होते. शासनाच्या माध्यमातून पंचनामे प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील 25 लाख 93 हजार शेतकऱ्यांसाठी 3 हजार 501 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 23 लाख 81 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले होते. शिवाय एका शेतकऱ्यास 3 हेक्टरपर्यंतची नुकसानभरपाई मिळणार आहे.
मोठी बातमी : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार 3,501 कोटी
अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही बसला होता. शिवाय या विभागात सोयाबीनचा अधिकचा पेरा आहे. त्यामुळे नुकसानीची दाहकता अधिक होती. असे असतानाही मदतीमधून उस्मानाबाद जिल्हा वगळण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1 हजार 596 कोटींची तरतूद केली गेली असून, दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार असल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.
मोठी निर्णय : अखेर कृषी सहायकांच्या आंदोलनाला यश
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1