• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Wednesday, July 9, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

जाणून घ्या उसाच्या तूऱ्याचे महत्व

शेतीमित्र by शेतीमित्र
April 8, 2021
in नगदी पिके
0
जाणून घ्या उसाच्या तूऱ्याचे महत्व
0
SHARES
9
VIEWS

तुरा आल्यावर उसाची वाढ खुंटते आणि म्हणून आपण तुरा न येणाऱ्या किंवा तुरा कमी येणाऱ्या जातींची निवड करतो. पण ऊसाला तुरा येणे महत्त्वाचे आहे. उस पिकात एका रोपाच्या भागापासून सारख्या जानुकविधेची अनेक रोपे मिळतात. त्यांना कृतिका ( क्लोन ) म्हणतात. चांगल्या कृतीकेची निवड करून त्यांची शुद्धता राखून अशा पिकात सुधारणा करता येते. परंतु नवीन जाती निर्माण करण्यासाठी दोन इच्छित वाणांचा संकर करणे गरजेचे असते. अश्या प्रकारे संकर केल्याने नवीन जनुकविधा मिळतात आणि त्यापासून एच्छिक गुणधर्म निवडून नवीन जात तयार केली जाते आणि संकर करण्यासाठी फुलोरा येणे महत्त्वाचे असते.

ऊसाला तुरा येण्याची प्रक्रिया : कुठल्याही पिकामध्ये संकरीकरण करून अनेक चांगल्या गुणांचा एकत्रित समुच्चय असणाऱ्या नवीन वाणांची निर्मिती करायची असेल तर त्यांना फुले येणे महत्वाचे असते. उसामध्ये सुध्दा नवीन वाण निर्माण करण्याच्या दृष्टीने तुरा येणे व त्यावर बीजधारणा होणे या प्रक्रियेला अनन्य साधारण महत्व आहे. पण शेतकऱ्यांच्या शेतावर ऊसाला तुरा येणे ही  बाब  मात्र अनिष्ट आहे. तुरा येण्यापूर्वी उभ्या ऊसाला बाणासारखी टोके (अॅरोविंग) दिसू लागतात आणि उसाची वाढ थांबते. अशी अवस्था आल्यानंतर तीन महिन्यात उस तोडला तर उत्पादन अथवा साखरेवर फारसा विपरीत परिणाम होत नाही . पण तुरा येऊन फुले झडू लागल्यावर उसामधल्या रसाची गुणवत्ता ढासळू लागते. साखरेचे रुपांतर ग्लुकोज व इतर प्राथमिक पदार्थांमध्ये होते. धाग्याचे प्रमाण वाढते. दशी सुटून उस भेंडाळतो. शेंड्याकडील डोळे फुटू लागतात.

तुरा येण्याच्या क्रियेवर परिणाम करणारे घटक

१. वाण : तुरा येण्याचे प्रमाण अनुवंशिक घटकांवर अवलंबून असते. को ७२१९, कोसी ६७१, को ९४०१२ या वाणांमध्ये तुरा लवकर येतो. को ७४०, को ७१२५, को ८०१४, को २६५ मध्ये तुरा उशिरा येतो.

कांद्याला तुरा येण्यापूर्वी साधारणपणे ७५ ते ९० दिवस पुष्पांकुर तयार होते. पुष्पांकुर तयार होण्याची प्रक्रिया प्रामुख्याने दिवसाचा प्रकाशकाळ किती मोठा आहे यावर अवलंबून असते. प्रकाशकाळाच्या प्रभावावर दिवसाचे तापमान, जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण, पोषणद्रव्यांची उपलब्धता, पानामधील ऑक्सिजन या संजीवकाचे प्रमाण यांचा मोठा परिणाम होऊ शकतो. उस पिक लघु दिवशीय असून डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत त्यास तुरा येतो. दिवसाचे तापमान २६ ते २८ अंश से., रात्रीचे तापमान २२ ते २३ अंश से., हवेतील आर्द्रता ६५ ते ९० टक्के, दिवसाचा प्रकाश काळ १२.30 तास आणि प्रकाश्याची तीव्रता १० ते १२ हजार फूट कॅंडल असे वातावरण पुष्पांकुर तयार होण्यास अनुकूल असते. असे वातावरण १० ते १२ दिवस सलग राहिल्यास पुढे ७० ते ९० दिवसात तुरा येतो. कोयंबतूर येथे अशी परीस्थिती जुलै च्या दुसऱ्या  आठवड्यापासून ऑगस्टच्या चौथ्या आठवड्यापर्यंत असू शकते. बिजापूर येथे (१७ N) ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून चौथ्या आठवड्यापर्यंत ही परिस्थिती असते. लखनऊ येथे हा काळ सप्टेंबर च्या दुसऱ्या ते चौथ्या आठवड्यात येतो. जसजसे विषुववृत्ताकडे जावे तसतसे पुष्पांकुर तयार होण्याची क्रिया लवकर घडते.

२. पाणथळ परिस्थिती : शेतामध्ये पाणी साठून राहत असेल तर तुरा येण्याचे प्रमाण जास्त राहते. एरवी तुरा न येणाऱ्या को ६३०४ सारख्या वाणाला सुद्धा पाणथळ परिस्थितीत तुरा येतो.

३. पाण्याचा ताण : पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात पिकाला पाण्याचा ताण पडला तर तुरा येण्याचे प्रमाण कमी राहते.

४. नत्राची कमतरता : पुष्पांकुर तयार होण्याचा काळात नायट्रोजन ची कमतरता निर्माण झाली तर मोठ्या प्रमाणात तुरा येतो म्हणून गावाच्या अक्षांशाप्रमाणे जास्तीत जास्त मोठा दिवस येण्याच्या वेळेला २५ टक्के वाढीव नत्राची मात्रा देऊन पुढे १५ दिवसांनी थोडा पाण्याचा ताण दिला तर तुरा येण्याचे प्रमाण कमी राहते. साखरेचा उतारा वाढतो. पावसाळी किंवा मिरगी डोस देण्याची पद्धत काही ठिकाणी या दृष्टीने महत्वाची आहे.

५. पिकाचा प्रकार : लागण उसापेक्षा खोडवा उसामध्ये तुरा येण्याचा प्रकार जास्त असतो. सुरु,पूर्व हंगामी आणि आडसाली असा कोणताही लागण हंगाम असला तरी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात ऊसाला तुरा येतो. एप्रिल ते जून या काळात लागण केलेला उस ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये तीन चार कांड्यावर असेल आणि तुरा येण्यास अनुकूल हवामान मिळाले तर अश्या ऊसाला डिसेंबर पर्यंत तुरा येऊ शकतो. पण ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये उगवण अथवा फुटवा अवस्था असेल तर त्यावर्षीच्या ऑक्टोबर डिसेंबर मध्ये तुरा येत नाही .

तुरा येऊ नये म्हणून काय करावे ?

१. शेंड्याजवळील पाने काढणे : उसाच्या शेंड्याजवळील ३-४ पानात पुष्पांकुर करणारी जैवरसायने तयार होत असतात. पाने पुष्पांकुर  तयार होण्याच्या काळात काढली तर तुरा येत नाही. शिवाय नवीन पाने येऊन वाढ चालू राहते. प्रत्यक्षात ही कृती व्यवहार्य नाही.

२. पाण्याचा ताण देणे : पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात थोडा पाण्याचा ताण दिला तर तुरा येणे टळते. पण महाराष्ट्रात हा काळ जुलै मध्ये येतो. त्यावेळी पावसाळा ऐनभरात असतो. त्यामुळे पाण्याचा ताण बसणे शक्य होत नाही आणि अपेक्षेप्रमाणे पाण्याचा ताण बसला तर फुटवे मारू लागतात. गाळप योग्य उसाची संख्या कमी होते. उत्पादन घटते ही बाब सुद्धा अव्यवहार्य आहे.

३. पॅराक़्वाट या रसायनाची फवारनी : पॅराक़्वाट या रसायनाचे (०.३५ किलो क्रियाशील घटक / हेक्टर) ३००० लिटर पाण्यात द्रावण करून गर्भांकुराच्या काळात फवारणी ४ दिवसाच्या अंतराने दोनदा केल्यास तुरा येत नाही. अशी फवारणी भरणीच्या वेळी केली तरी फायदा होतो.

तुरा नियंत्रण करण्याचे फायदे : उष्ण कटीबंधामध्ये तुरा नियंत्रण केलेल्या उसाचे टनेज वाढते. साखरेचे प्रमाण सुद्धा वाढते. उसाची वाढ चालू राहते. समशीतोष्ण कटिबंधात मात्र तुरा येवो अथवा न येवो नोव्हेंबर पासून येणाऱ्या थंडीमुळे उसाची वाढ थांबलेली असते. त्यामुळे तुरा नियंत्रण करून फारसा फायदा होत नाही. पण एक फायदा मात्र असा होतो की मार्च महिन्यानंतर जरी उस तुटला तरी साखरेचे प्रमाण कमी होत नाही.  

प्रा. व्ही. डी. वाघमारे (सहाय्यक प्राध्यापक मो.९९२१००८२९१)  प्रा. एस. एम. राठोड (सहाय्यक प्राध्यापक मो. 9403199937) 

रंगनाथ महाराज कृषी महाविद्यालय नाव्हा, ता. जि. जालना ४३१२०३

Tags: importance of sugarcane flowerLearn the importance of sugarcane stalksusaala ture
Previous Post

चिकू लागवडीचे कसे असते परफेक्ट व्यवस्थापन

Next Post

सोप्या पद्धतीने अशी करा मत्स्यशेती

Related Posts

असे करा उसावरील हुमणीचे नियंत्रण
किड-रोग व तणे

असे करा उसावरील हुमणीचे नियंत्रण

August 16, 2022
आडसाली उसाच्या जोमदार वाढीसाठी लागवड तंत्रज्ञान
नगदी पिके

आडसाली उसाच्या जोमदार वाढीसाठी लागवड तंत्रज्ञान

August 20, 2022
उत्पादकता वाढविण्यासाठी ऊस शेतीत हे बदल अपेक्षीत !
नगदी पिके

उत्पादकता वाढविण्यासाठी ऊस शेतीत हे बदल अपेक्षीत !

May 19, 2022
कापसाची मोबाइल जिनिंग सुविधा आता बांधावरच
नगदी पिके

कापसाची मोबाइल जिनिंग सुविधा आता बांधावरच

February 27, 2022
असे करा आडसाली उसाचे खत व्यवस्थापन
नगदी पिके

असे करा आडसाली उसाचे खत व्यवस्थापन

August 2, 2021
असे करा आडसाली ऊस लागवडीचे नियोजन
नगदी पिके

असे करा आडसाली ऊस लागवडीचे नियोजन

August 1, 2021
Next Post
सोप्या पद्धतीने अशी करा मत्स्यशेती

सोप्या पद्धतीने अशी करा मत्स्यशेती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

231273
Users Today : 25
Users Last 30 days : 708
Users This Month : 229
Users This Year : 5603
Total Users : 231273
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us