राज्यात मागच्या चार दिवसांपासून सुरू झालेला पाऊस आणखी चार दिवस सक्रीय राहणार असल्याचे हवामान विभागने सांगितले आहे. राज्यात गेल्या आठ दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या कोकण, घाट परिसरात मान्सून सक्रिय आहे. राज्याच्या काही भागांत 16 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे.
मोठी बातमी : लम्पी स्कीननंतर आता चायनीज व्हायरसची धास्ती ?
मागच्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढत आहे. पावसाने नद्या, ओढे, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. पुढचे चार पाऊस राज्यात थैमान घालण्याची शक्यता आहे. राज्याच्या काही भागांत मुसळधार सुरूच राहणार आहे. राज्याच्या काही भागांत 16 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर काही भागांत पावसाचा जोर कमी होणार आहे. दरम्यान, वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कोल्हापूरला ‘यलो अलर्ट’ पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे (घाट-मुसळधार), कोल्हापूर (घाट-मुसळधार), सातारा (घाट-मुसळधार), औरंगाबादसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वादळी वारे व पाऊस यामुळे समुद्रदेखील खवळला असून सध्या पावसामुळे मच्छीमारी ठप्प झाली आहे. ताशी 45 ते 60 कि.मी. वेगाने जोराचे वारे वाहत आहेत.
हे नक्की वाचा : देशात यंदा अन्नधान्याचे 3 हजार 157 लाख टन उत्पादन अपेक्षित : नरेंद्र सिंह तोमर
हवामान विभागाने 11 ते 15 सप्टेंबर या कालावधीत काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. समुद्रात ताशी 45 ते 60 किमी. वेगाने वारे वाहणार असण्याची शक्यता वर्तविली. यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मच्छीमारीसाठी जावू नये, असा संदेश आल्याने समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत.
मोठी घोषणा : सहकारी सोसायट्या मार्फत मध्यम व दीर्घ पतपुरवठ्याचा धोरणात्मक विचार : अमित शहा
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1